कीर्तनसिंधू ह. भ. प. सागर महाराज बोराटे, नातेपुते यांचे खुडूस येथे सुश्राव्य कीर्तन होणार

कै. ज्योतीराम वाघ यांच्या पुण्यस्मरण निमित्त किर्तन, आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन
खुडूस (बारामती झटका)
कै. ज्योतीराम (तात्या) भगवान वाघ यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे आयोजन गुरुवार दि. ०३/०९/२०२६ रोजी खुडूस, पानीव पाटी, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे. या पुण्यस्मरण निमित्त कीर्तनसिंधू ह. भ. प. सागर महाराज बोराटे, नातेपुते यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कीर्तनानंतर आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

या पुण्यस्मरण सोहळ्यास उपस्थित राहून सुश्राव्य किर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन समस्त वाघ परिवार खुडूस यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



