‘स्त्री : संघर्ष ते स्वराज्य २०२६’ अंकाचे कुंडल येथे उत्स्फूर्त स्वागत, स्त्री शक्ती मंचाचा अभिनव उपक्रम

सांगली (बारामती झटका)
क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड महाविद्यालय कुंडल, ता. पलूस, जि. सांगली येथे ‘स्त्री : संघर्ष ते स्वराज्य २०२६’ या विशेषांकाचे मान्यवरांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्री. योगेशजी सोमण, स्वागताध्यक्ष क्रांतिअग्रणी सहकारी साखर कारखाना लि., कुंडलचे चेअरमन श्री. शरदभाऊ लाड तसेच SVERI शिक्षण संस्था पंढरपूरचे संचालक डॉ. बब्रुवाहन रोंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अंकाच्या कार्यकारी संपादक कु. प्रगती गेंड यांनी उपस्थितांना अंकाविषयी प्राथमिक माहिती देत मनोगत व्यक्त केले. हा विशेषांक स्त्रीच्या संघर्षापासून स्वराज्यापर्यंतच्या प्रेरणादायी प्रवासाला साहित्यिक व्यासपीठ देणारा विशेषांक असून विविध क्षेत्रांतील स्त्रियांचे अनुभव, विचार आणि कर्तृत्व यामध्ये मांडण्यात आले आहे.

या अंकाचे मुख्य संपादक चंद्रकांत तायडे यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील कार्यकारी संपादक भगिनींचे मोलाचे योगदान लाभले आहे. प्रशासकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक व राजकीय अशा विविध क्षेत्रांतील साहित्यिक लेखांनी अंक समृद्ध झाला आहे. कार्यक्रमप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी अंकाच्या उपक्रमाचे कौतुक केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



