ताज्या बातम्यासामाजिक

झी टॉकीज फेम ह. भ. प. रोहन महाराज पवार, बिजवडी यांचे लवंग येथे सुश्राव्य कीर्तन होणार

कै. तुकाराम केचे पाटील यांच्या पुण्यस्मरण निमित्त कीर्तन, आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन

लवंग (बारामती झटका)

लवंग, ता. माळशिरस गावचे प्रगतशील बागायतदार कै. तुकाराम ज्ञानोबा केचे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे आयोजन मंगळवार दि. २९/९/२०२६ रोजी लवंग, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहेत. या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त झी टॉकीज फेम कीर्तनकार ह. भ. प. रोहन महाराज पवार, बिजवडी यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कीर्तनानंतर आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. अखिल भारतीय मराठा महासंघ युवक जिल्हाध्यक्ष विशाल उर्फ जयकुमार केचे पाटील यांचे ते वडील होते.

कै. तुकाराम केचे पाटील यांच्या दुःखद निधनाने के चे पाटील परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कै. तुकाराम केचे पाटील धार्मिक वृत्तीचे होते. त्यांचा स्वभाव मनमिळावू व सर्वांना एकत्र बांधून ठेवणारा होता. त्यांना समाजामध्ये आदराचे व मानाचे स्थान होते. त्यामुळे त्यांच्या जाण्याने समाजामध्ये पोकळी निर्माण झाली आहे.

तरी या पुण्यस्मरण सोहळ्यास उपस्थित राहून सुश्राव्य कीर्तनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन समस्त केचे पाटील परिवार, २५/४ लवंग व जांभूड यांच्यावतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button