खुडूस येथील ममताबाई बापूराव ठवरे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन..

खुडूस गावचे माजी उपसरपंच डॉ. तुकाराम ठवरे यांना मातृषोक…
खुडूस (बारामती झटका)
खुडूस, ता. माळशिरस गावातील ममताबाई बापूराव ठवरे यांचे वयाच्या 70 व्या वर्षी शनिवार दि. 26 सप्टेंबर 2026 रोजी पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन सुना, नातवंडे असा परिवार आहे. खुडूस गावचे माजी उपसरपंच डॉक्टर तुकाराम ठवरे व हनुमंत ठवरे यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्यावर आजच सकाळी नऊ वाजता खुडूस मधील झिरे पठार येथील राहत्या निवासस्थानाशेजारील शेतामध्ये अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

ममताबाई यांच्या दुःखद निधनाने ठवरे परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. ठवरे परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो व स्वर्गीय ममताबाई ठवरे यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच बारामती झटका परिवार यांचे कडून भावपूर्ण आदरांजली आहे..

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



