रुग्णांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि मनातील समाधान हेच आपल्या प्रयत्नांचे खरे फलित – लोकप्रिय दमदार मा. आमदार आरोग्यदूत राम सातपुते

कुसमोड येथील दत्तू गारुळे यांच्या दोन्ही पायांचे लोकप्रिय दमदार मा. आ. आरोग्यदूत राम सातपुते यांनी लाखो रुपयांचे ऑपरेशन मोफत करवून दिले
रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा…
कुसमोड (बारामती झटका)
माळशिरस विधानसभा मतदारसंघातील कुसमोड गावातील शेतकरी श्री. दत्तू शंकर गारुळे यांच्या दोन्ही पायांचे लाखो रुपयांचे ऑपरेशन लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत राम सातपुते यांनी मोफत करवून दिले.
अत्यंत सामान्य शेतकरी जीवन जगणाऱ्या दत्तूभाऊंवर मोठे संकट आले होते. तुटपुंज्या शेतीवर कसातरी कुटुंबाचा उदरनिर्वाह चाललेला असताना अचानक हे संकट आले. शेतीच्या कष्टावर आणि मिळेल त्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या दत्तूभाऊंना दोन्ही पायांच्या गंभीर समस्येमुळे डॉक्टरांनी दोन्ही पायांचे ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. या उपचारासाठी तब्बल ६ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. एवढी मोठी रक्कम उभी करणे त्यांच्या कुटुंबासाठी जवळपास अशक्यच होते.

अशा परिस्थितीत कुसमोड गावातील भाजपा कार्यकर्ते श्री. संजय पाटील यांनी दत्तू गारूळे यांना लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत राम सातपुते यांच्याकडे घेऊन आले. यावेळी दत्तू गारुळे यांनी आपली कैफियत मांडली. दत्तूभाऊंची परिस्थिती समजून घेतल्यानंतर त्यांच्या उपचारासाठी आवश्यक ती मदत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणि लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत राम सातपुते यांनी फोन करून त्यांच्या ऑपरेशनची व्यवस्था केली.

काही महिन्यांपूर्वी दत्तूभाऊंच्या एका पायाचे ऑपरेशन झाले होते. त्या वेळीही त्यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक आणि मानसिक संकट होते. मात्र उपचारानंतर हळूहळू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली. आता दुसऱ्या पायाचेही ऑपरेशन झाले आहे.

ऑपरेशन नंतर बरे होऊन दत्तूभाऊंनी लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत राम सातपुते यांना फोन केला.
त्यांच्या बोलण्यातला आनंद, समाधान आणि नव्या आयुष्याची उमेद मनाला स्पर्शून गेली. काही महिन्यांपूर्वी वेदना आणि चिंतेत असलेले दत्तूभाऊ आज ऑपरेशन यशस्वी झाल्याचा आनंद व्यक्त करत होते. त्यांच्या परिवाराच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि मनातील समाधान हेच आपल्या प्रयत्नांचे खरे फलित आहे, असे लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत राम सातपुते यांनी सांगितले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



