क्रीडाताज्या बातम्यासामाजिक
अंकोलीच्या चॅम्पियन कराटे क्लबच्या खेळाडूंचे राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत घवघवीत यश

अंकोली (बारामती झटका) दशरथ रणदिवे यांजकडून
राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत अंकोलीच्या चॅम्पियन कराटे क्लबच्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळवून आपला क्रीडा क्षेत्रातील दबदबा कायम ठेवला आहे.
पुणे येथे राज्यस्तरीय कराटे स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेत येथील कराटे चॅम्पियन क्लबच्या खेळाडूंनी हे यश मिळवले आहे. या स्पर्धेमध्ये अतिशय दर्जेदार कामगिरी करत आठ सुवर्णपदके, दहा रजत पदके, पंधरा कास्य पदके आणि सहा जणांनी सहभाग पदके पटकावली आहेत.

याशिवाय काता जनरल चॅम्पियनशिप मध्ये द्वितीय क्रमांक मिळवत ट्रॉफी जिंकली आहे. या यशस्वी खेळाडूंना शिहान संतोष मोहिते व सेन्साई रोहित पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



