खासदार यांनी नवीन पोस्ट आफिस मंजूर करण्यापेक्षा मंजूर असलेल्या पोस्ट कार्यालयात सुविधा देण्यासाठी प्रयत्न करावेत……….

पोस्ट कार्यालयात पोस्टाच्या पाकिटाचा वानवा, नागरिकांची इतर पाकीट खरेदी करण्याकरता वणवण भटकंती………
माळशिरस (बारामती झटका)
देशाचे सर्वोच्च सभागृह संसदेत अनेक मोठमोठे प्रोजेक्ट्स विकास योजना मंजूर करण्याचे काम खासदार करीत असतात. माढा लोकसभेचे माजी खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी संसदेमध्ये माढा लोकसभा मतदार संघामध्ये अनेक प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडलेली आहे. रस्त्याचे, सिंचनाचे तसेच रेल्वे प्रश्न सोडवलेले आहेत. खासदारांची कामे काय असतात, हे रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी दाखवून दिलेले आहे.
मात्र, विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदार संघासाठी कोणतेच ठोस असे मोठे काम अथवा प्रकल्प आणलेला नाही. दिवसेंदिवस अडगळीला पडत असलेले पोस्ट ऑफिस मतदारसंघामध्ये मंजूर करून विकासकामे केलेला कांगावा केलेला होता. परंतु, सध्या पोस्ट ऑफिसमध्ये सर्वसामान्य जनता ज्येष्ठ नागरिक व बचत गटाच्या महिलांना पत्रव्यवहार करण्याकरता पाकीटे मिळत नाहीत. पोस्ट कार्यालयात पोस्टाच्या पाकिटाचा वानवा आहे. नागरिकांना इतर ठिकाणी पाकीट खरेदी करण्याकरता वणवण भटकंती करावे लागत आहे.

खासदार यांनी नवीन पोस्ट ऑफिस मंजूर करण्यापेक्षा मंजूर असलेल्या पोस्ट कार्यालयात सुविधा देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी त्रस्त जनतेतून मागणी होत आहे. अनेक दिवसांपासून पोस्ट ऑफिसमध्ये पाकिटांचा तुटवडा आहे. नागरिकांना अडचण येत आहे. अडचण दूर करण्यासाठी खासदार यांनी प्रयत्न करावेत. खऱ्या अर्थाने बदलत्या काळानुसार जग चंद्रावर चाललेले आहे मात्र, माढ्याचा खासदार अजून पोस्ट ऑफिस उघडण्यामध्येच दंग असल्याची खासदार चर्चा मतदार संघात सुरू आहे…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



