ताज्या बातम्यासामाजिक

बारामती झटका संपादक श्रीनिवास वेणुबाई शिवाजीराव कदम पाटील यांच्या वाढदिवसाला लोकप्रतिनिधी, मित्रपरिवार नातेवाईक यांचा शुभेच्छांचा वर्षाव…..

ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे, कृषी मंत्री दत्तामामा भरणे, मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,मा. आमदार राम सातपुते यांच्यासह अनेकांच्या अर्थपूर्ण शुभेच्छा …

माळशिरस (बारामती झटका)

मळोली, ता. माळशिरस गावचे थोर सुपुत्र बारामती झटका वेब पोर्टल आणि यूट्यूब चॅनल संपादक श्रीनिवास वेणूबाई शिवाजीराव कदम पाटील यांचा वाढदिवस 2 सप्टेंबर रोजी असतो. बुधवार 2 सप्टेंबर रोजी वाढदिवसाला लोकप्रतिनिधी, मित्र परिवार, नातेवाईक, पत्रकारीतेच्या क्षेत्रातील ज्येष्ठ, समवयस्क पत्रकार बांधव, महिला भगिनी यांचा शुभेच्छांचा वर्षाव झालेला आहे. वाढदिवसानिमित्त मातोश्री स्वर्गीय वेणूबाई व पिताश्री स्वर्गीय शिवाजीराव लक्ष्मणराव कदम पाटील यांचा आशीर्वाद घेऊन श्रीक्षेत्र वश्या मारुती देवस्थान हनुमाननगर, गोरेवस्ती, मारकडवाडी, ता. माळशिरस येथील हनुमंत रायाचे मनोभावे दर्शन घेतले..

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे, कृषिमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दत्तामामा भरणे, माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार रामभाऊ सातपुते, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती फत्तेसिंह माने पाटील, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष युवा नेते डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील, सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती सौ. संस्कृतीताई राम सातपुते, माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक डॉ. आप्पासाहेब देशमुख, पिलीव जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत जाधव, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोरभैया सुळ पाटील, मल्हार साखर कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर प्रितमसिंह देवकाते पाटील, खरेदी विक्री संघाचे चेअरमन नितीनराजे निंबाळकर, शिवप्रसाद उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शरदबापू मोरे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ हिवरकर पाटील, ओबीसी जिल्हा अध्यक्ष सुमितभैया जानकर, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर महादेवराव देशमुख, बबनराव देवकाते पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले, आरपीआय युवक राज्य उपाध्यक्ष किरणतात्या धाईंजे, मनसेचे तालुकाध्यक्ष सुरेशभाऊ टेळे, माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती हंसराज माने पाटील, माजी उपसभापती ॲड. विशाल पाटील, महाळुंग श्रीपुर नगराध्यक्ष अशोकराव चव्हाण, भारतीय जनता पार्टी नातेपुते मंडळ उपाध्यक्ष हरिभाऊ पालवे पाटील, भाजपचे नातेपुते शहराध्यक्ष राजेंद्र (बॉस) पांढरे, अकलूज शहराध्यक्ष महादेवराव कावळे असे कितीतरी अगणित मान्यवरांसह जिल्हा परिषद, पंचायत समितीचे आजी-माजी सदस्य, साखर कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ, आजी माजी संचालक, नगरपरिषद, नगरपंचायत आजी-माजी नगरसेवक, भारतीय जनता पार्टी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, राष्ट्रीय समाज पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, अण्णासाहेब पाटील मराठा महासंघ, मराठा सेवा संघ, अखिल भारतीय होलार समाज व यंग ब्रिगेड संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटना, जय मल्हार क्रांती संघटना, जय लहुजी संघटना, मुस्लिम समाज संघटना, यांच्यासह विविध सामाजिक संघटनेचे राज्य जिल्हा, तालुका, पदाधिकारी, समाजातील प्रतिष्ठित इंजिनिअर, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, शिक्षक आणि जगाचा पोशिंदा असणारे शेतकरी बांधव, बचत गटासह सामाजिक राजकीय कार्यात अग्रेसर असणाऱ्या महिलाभगिनी, तरुण कार्यकर्ते, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांनी दिवसभर व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, भ्रमरध्वनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छांचा वर्षाव केलेला होता.

संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी वाढदिवसाला मित्रपरिवार व नातेवाईक यांना सुचवलेले होते. फेटा, हार, शाल, श्रीफळ, गुच्छ अशा वस्तूंना वायफट खर्च व आपला अमूल्य वेळ खर्च करण्यापेक्षा फोन पे गुगल पे वरून अर्थपूर्ण शुभेच्छा द्याव्या, असे आवाहन केलेले होते‌ मित्रपरिवार व नातेवाईक यांनी एक रुपयापासून 20 हजारापर्यंत अर्थपूर्ण शुभेच्छा दिलेल्या आहेत.

ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत नाना कुंभार, भारत तात्या मगर यांच्यासह प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, न्यूज चॅनल युट्युब, वेब पोर्टल संपादक प्रतिनिधी यांनीही भरभरून शुभेच्छा दिल्या. अनेक कितीतरी मित्रपरिवार नातेवाईक व पत्रकारिता क्षेत्रातील बांधवांनी आपल्या स्वतःच्या फेसबुकवर, स्टेटसवर वाढदिवसाच्या शुभेच्छांची पोस्टर तयार करून ठेवलेली होती. व्हाट्सअप च्या तीन मोबाईल नंबर वरून शुभेच्छा येत होत्या. मोबाईल दोन वेळा चार्जिंग करावा लागतो. एवढे प्रेम मित्रपरिवार व नातेवाईक यांनी दिले..

पत्रकारितेच्या माध्यमातून समाजामध्ये वावरत असताना अनेक लोकांच्या अडीअडचणी व शासन दरबारात गलथान कारभाराविषयी आवाज उठवून सर्वसामान्य जनतेला न्याय दिल्यानंतर जनतेच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच पत्रकारितेच्या क्षेत्रातील सर्वोच्च आनंदाचा क्षण असतो. अशाच पद्धतीने गेली अनेक वर्ष पाक्षिक, साप्ताहिक च्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडलेली होती. गेल्या आठ वर्षापासून वेब पोर्टल व यूट्यूब चॅनल च्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या सानिध्यात आहेत. लग्न समारंभ, पुण्यतिथी, जागरण गोंधळ गजी ढोल, वाढदिवस, कुस्ती मैदान, राजकीय सभा, बैठका अशा अनेक कार्यक्रमांमधून जनतेशी थेट संपर्क असल्याने वाढदिवसाला याचा प्रत्यय आलेला आहे. यावरून बोटावर मोजण्याएवढे टीका करणारे असतात मात्र, आपलेपणा असणाऱ्या लोकांची संख्या एवढी मोठी असते हे वाढदिवसाला मूल्यमापन झालेले आहे.

वाढदिवसाला ज्ञात अज्ञात सर्वांनी भरभरून शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल श्रीनिवास कदम पाटील परिवार व बारामती झटका परिवार हितचिंतक यांच्या कायम ऋणात राहतील…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button