ताज्या बातम्याराजकारण

दादांच्या अपघातावरून राजकारण नको, सत्य समोर येऊ द्या. दादा प्रेमींच्या भावना…

बारामती (बारामती झटका)

दादा आज आपल्यात नाहीत ही वस्तुस्थिती त्यांच्या कुटुंबासाठी किती वेदनादायी आहे, हे फक्त आरोप करणाऱ्यांना कधीच समजणार नाही. एका कुटुंबाने आपला आधार गमावला आहे. वहिनींनी पती, मुलांनी वडील गमावले आहेत. आणि महाराष्ट्राने आपला कर्तृत्ववान नेता गमावला आहे.

अशा परिस्थितीत दादांच्या अपघाताची चौकशी सुरू असताना खा. सुप्रिया सुळे आणि आ. रोहित पवार वारंवार माध्यमांसमोर येऊन वेगवेगळे आरोप का करत आहेत ?, चौकशी पूर्ण होईपर्यंत संयम का ठेवत नाहीत ?

पवार साहेब एकीकडे म्हणतात दादांचा घात झालेला नाही, हा अपघात आहे. मग रोहित पवार आणि सुप्रिया सुळे चौकशी अहवाल यायच्या आधीच संशयाचे वातावरण का निर्माण करत आहेत.

सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांची पंतप्रधान
नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर मुलीच्या लग्नाच रिसेप्शन असो अथवा मध्यंतरी खासदारांनी भेट घेतली असो वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने भेट झाली आहे. जर दादांच्या अपघाताबाबत खरोखरच गंभीर शंका असतील, तर त्या भेटींमध्ये त्यांनी थेट चौकशीची मागणी का केली नाही ? फक्त कॅमेऱ्यासमोर प्रश्न उपस्थित करून काय उपयोग ? असाही सवाल उपस्थित होत आहे.

सर्वात महत्त्वाचं दादा हयात असताना सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांची दादांबाबतची भूमिका काय होती हे महाराष्ट्र विसरलेला नाही. मग आज दादा आपल्यात नसताना अचानक व्यक्त होणारं हे प्रेम आणि कळवळा किती गांभीर्याने घ्यायचा हा देखील मोठा प्रश्न आहे.

दादांवर खरंच प्रेम असेल, तर त्यांच्या कुटुंबाला दुःखात आधार द्या. दादांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर जे आभाळ कोसळलं आहे, त्यावर राजकारणाचं मीठ चोळू नका.

चौकशी सुरू आहे ती पूर्ण होऊ द्या.
सत्य समोर येऊ द्या जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई होणारच आहे पण चौकशी पूर्वीच आरोप करून दादांच्या कुटुंबाला राजकीयदृष्ट्या बदनाम करण्याचा प्रयत्न तात्काळ थांबवा, दादा प्रेमींच्या भावना आहेत…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button