सोलापूर जिल्हा परिषदेची स्थायी समिती बैठक संपन्न

सोलापूर (बारामती झटका)
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबतच विविध विभागांतील प्रलंबित प्रश्नांना गती देत लोकहिताच्या विषयांना प्राधान्य देण्याच्या उद्देशाने काल जिल्हा परिषद सोलापूरच्या स्थायी समितीची बैठक पार पडली, यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीमध्ये जनसुविधा निविदा व निधीची बिले पूर्वीप्रमाणे तालुका स्तरावरच ठेवण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच सन २०२५-२६ मधील ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानात तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या शाळांची प्रलंबित बक्षीस रक्कम तातडीने अदा करावी आणि या शाळांचा जिल्हास्तरावर प्रमुखांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
यासोबतच PHC मोरोची येथील गरोदर महिलांच्या प्रलंबित सोनोग्राफी बिलांचा प्रश्न, प्रत्येक PHC ला अशासेविकांच्या कामासाठी झेरॉक्स मशीन उपलब्ध करून देण्याची मागणी, ग्रामपंचायत ऑपरेटरच्या प्रलंबित मानधनाचा विषय तसेच गट-ड परिचरांना आरोग्य सेवक पदावर पदोन्नती देण्याचा विषय बैठकीत ठामपणे मांडण्यात आला. या सर्व विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे.

सामान्य नागरिक, विद्यार्थी, आरोग्यसेवा कर्मचारी आणि ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देत विकासकामांना गती देणे, हीच आमची प्राथमिकता आहे. लोकहिताच्या प्रत्येक प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार कायम आहे.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मा. श्री. दीपक वैद्य, उपाध्यक्ष मा. श्री. इंद्रजित पवार, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती मा. श्री. रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मा. सौ. अमृताताई वाघे, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कुशल जैन साहेब, सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीणकर यांच्यासह सर्व मान्यवर सदस्य व अधिकारी उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



