लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर युनिट कडून दक्षता जनजागृती सप्ताह – २०२६ निमित्त जिल्हयातील सर्व तालुक्यामध्ये विविध जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन

सोलापूर (बारामती झटका)
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार दि. २६ ऑक्टोबर २०२६ ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह – २०२६ (Vigilance Awareness Week) साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहनिमित्त लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर घटक यांच्या वतीने सोलापूर जिल्हयातील सर्व तालुक्यामध्ये भ्रष्टाचार निर्मुलन, पारदर्शक प्रशासन आणि नागरिकांमध्ये भ्रष्टाचार विरोधी जागरुकता निर्माण करण्यासाठी विविध जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमाअंर्तगत शासकीय व निमशासकीय कार्यालय, शैक्षणिक संस्था, महाविद्यालय, तसेच ग्रामीण भागांमध्ये व्याख्याने, कार्यशाळा, आणि इतर प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच समाजमाध्यमे, व्हॉटसअॅप संदेश, ई-मेल च्या माध्यमातुन भ्रष्टाचार विरोधी संदेश नागरिकांपर्यंत पोहचविण्यात येणार आहेत.
या सप्ताह दरम्यान नागरिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्य, लाच मागणी विरोधात तक्रार करण्याची प्रक्रिया, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील महत्वाच्या तरतुदी तसेच कायदयाविषयी प्रबोधनात्मक माहिती देण्यात येणार आहे.
शासकीय कामकाजासाठी कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधुन तक्रार करावी. भ्रष्टाचार विरोधात जागरुक राहुन प्रामाणिक व पारदर्शक प्रशासनाच्या निर्मितीसाठी नागरिकांनी सर्कीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर यांच्यावतीने करण्यात येत आहे. भ्रष्टाचार मुक्त समाजाच्या निर्मितीसाठी जनजागृती, पारदर्शकता आणि नागरिकांचा सहभाग ही काळाची गरज आहे.
भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती अगर लाच मागणारे लोकसेवकांविरोधी तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी खालील नमुद केल्याप्रमाणे संपर्क साधावा, असे आवाहन सोलापूर लाचलुचतपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक प्रशांत चौगुले यांच्यावतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



