कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा स्वागतासाठी वेळापूर ग्रामपंचायत सज्ज…
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली व गटविकास अधिकारी विनायक गुळवे यांच्या नियोजनात ग्रामविकास अधिकारी दिपक गोरे यांचा महिला भाविकांच्या सोयीसाठी स्तुत्य उपक्रम
वेळापूर ( बारामती झटका )
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारीतील माळशिरस तालुक्यातील शेवटचा तिसरा मुक्काम व पंचायत समितीच्या ग्रामपंचायतीचा पहिला मुक्काम वेळापूर येथे होत आहे. त्या धरतीवर वेळापूर ग्रामपंचायत विभाग, दूरसंचार विभाग, महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य वीज वितरण विभाग, पाणीपुरवठा विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्राचे औषध उपचार केंद्र विभाग, महिला वारकऱ्यांसाठी हिरकणी कक्ष, महिला विश्रांती ग्रह, माता बालक सुश्रुषा ग्रह, महिलांसाठी मोफत पॅड अशा सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

आपत्ती व्यवस्थापन कक्षामधून वारकरी व भाविक भक्तांच्या अडचणी सोडविण्यासाठी मदत केली जाते. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली व गटविकास अधिकारी विनायक गुळवे यांच्या नियोजनात सरपंच सौ. विमलताई जानकर, उपसरपंच जावेद आतार यांच्या सहकार्याने ग्रामविकास अधिकारी दिपक गोरे यांचा महिला भाविकांच्या सोयीसाठी स्तुत्य उपक्रम राबविला आहे.

माळशिरस तालुक्यात श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे तीन मुक्काम आहेत. त्यापैकी नातेपुते व माळशिरस या ठिकाणी नगरपंचायत अस्तित्वात आहेत. वेळापूर एकमेव ग्रामपंचायत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारीतील मुक्काम आहे. त्यामुळे वारकरी व भाविक भक्तांच्या सुख सोयीसाठी सर्व प्रशासन सज्ज झाले आहे.

स्वच्छता
१) विसावा व पालखी तळ या ठिकाणचे ट्रॅक्टर, जेसीबी मशीनद्वारे स्वच्छता केली आहे.
२) गाव अंतर्गत सर्व पालखी मार्गे रास्ते काटेरी झाडे काढून घेण्यात आली आहेत.
३) गाव अंतर्गत धूर फवारणी, जंतू नाशक फवारणी पुढील पाच दिवसांपर्यंत सुरु राहील.

पाणीपुरवठा
१) सांगोला-वेळापूर रोडवरील १० विहिरींमधून शासकीय टँकरद्वारे व खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केलेला आहे. (शासकीय टँकर – ३५, खाजगी टँकर ७००)
२) पालखी मार्गालगतचे जवळपास विहिरींचे पाण्याचे क्लोरोनेशन केले गेलेले आहे.
३) पालखी तळालगत १५ स्टॅन्ड पोस्टवर पाण्याच्या टाकीद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
४) टँकर भरण्याच्या ठिकाणी व रास्ते मुरमिकरण केलेले आहे.

शौचालय
१) गावामध्ये सार्वजनिक १६ शौचालये दुरुस्तीचे व स्वच्छतेचे काम करून तयार आहेत.
२) चालू वर्षी १००० मोबाईल टॉयलेट येणार असून त्याचे एकूण १२ ठिकाणे फिक्स केले आहेत. त्याठिकाणी लाईट व पाण्याची सोय करण्यात आली आहे.
सुरक्षा
१) पालखी तळालगत दोन अग्निशामक गाड्या ठेवलेल्या आहेत
२) सीसी टीव्ही बसविण्यात आले आहेत.

विद्युत
१) गावामध्ये अंदाजे ५०० पोलवरील दिवे सुरु करण्यात आलेले आहेत.
२) पालखी तळावर एकूण ७ हायमास्ट दिवे आहेत.
३) पालखी तळावर जनरेटरची सोय केली आहे. अशा सर्व सुविधा अद्यावत केलेल्या आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng