Uncategorizedताज्या बातम्या

धानोरे गावात रस्ते दुरुस्ती, नळदुरुस्ती, पथदिवे दुरुस्ती करावी – सचिन देवकते

तालुका अध्यक्ष अजितभैय्या बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटना गावातील विविध प्रश्नांसाठी आक्रमक

माळशिरस (बारामती झटका)

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष अजितभैय्या बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्ष सचिन देवकते यांनी धानोरे ता. माळशिरस ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे. गावातील रस्ते दुरुस्ती करणे, नळदुरुस्ती करणे, पथदिवे सुरू करणे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी तालुका अध्यक्ष अजितभैय्या बोरकर धानोरे गावाच्या विविध मागण्यांसाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

सदर निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, मौजे धानोरे येथील मरीआई मंदिर शेजारील सिमेंट काँक्रीट रस्ता पूर्णपणे उखडला असून गावातील नागरिकांना वाहतुकीदरम्यान प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे. तसेच गावातील सार्वजनिक पाणी पुरवठा करणारे नळ मोडकळीस आले असून त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असून त्याची तात्काळ दुरूस्ती व्हावी. त्याचबरोबर रस्त्याकडेचे पथदिवे मोठ्या प्रमाणात बंद पडले असून ते बदलून पथदिव्यांची व्यवस्था करण्यात यावी. अशा मागण्यांचे निवेदन धानोरे गावचे सरपंच, ग्रामसेवक यांना देण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button