भारतीय जनता युवा मोर्चाच्या माळशिरस तालुका उपाध्यक्षपदी माळशिरस शहरातील युवा नेते दिनेश धाईंजे यांची नियुक्ती…
माळशिरस शहरात भारतीय जनता युवा मोर्चाला उच्च शिक्षीत व उद्योग व्यवसायात गगनभरारी घेतलेले मुर्ती लहान पण, कर्तुत्व महान असणारे दिनेश धाईंजे यांच्या निवडीने माळशिरस शहरात अच्छे दिन येणार ……
माळशिरस ( बारामती झटका)
भारतीय जनता पक्षाची माळशिरस येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक संपन्न झाली. यावेळी के. के. पाटील भाजपा जिल्हा सह प्रभारी, सोपान नारनवर जिल्हा उपाध्यक्ष, बाळासाहेब सरगर जिल्हाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा, हनुमंतराव सूळ, बाळासाहेब वावरे, बी. वाय. राऊत, मुक्तार कोरबू, बाळासाहेब लवटे पाटील, संदीप पाटील, लक्ष्मण गोरड, तालुका संघटन सरचिटणीस संजयजी देशमुख, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष दादासाहेब खरात, उद्योजक दत्तात्रय शेळके, लक्ष्मण माने, राहूल मदने, राजेंद्र वळकुंदे, उद्योजक सतीशतात्या ढेकळे, हनुमंत कर्चे, भैय्यासाहेब चांगण, युवा नेते मनोज जाधव, सुनील बनकर, युवराज वाघमोडे, बलभीम जाधव, मिनीनाथ मगर, लाला साळवे आदी तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली.
या बैठकीत भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष दादासाहेब खरात यांनी माळशिरस शहरातील युवा नेते दिनेश धाईंजे यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड करून नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.



दिनेश धाईंजे यांनी कमी वयामध्ये उद्योग व्यवसायात गरुड भरारी घेतलेली आहे. सिद्धिविनायक डेव्हलपर्स ग्रुपच्या माध्यमातून माळशिरस तालुक्यात बिगर शेती प्लॉटची विक्री करून सर्वसामान्य जनतेच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी ना नफा ना तोटा या तत्त्वावर अनेक ठिकाणी प्लॉट्स विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. दिनेश यांचे संघटन कौशल्य चांगले आहे. त्यांचा माळशिरस परिसरात जनसंपर्क दांडगा आहे. लहानपणापासून उद्योग व्यवसायाबरोबर राजकारण व शिक्षणाची आवड आहे. मूर्ती लहान पण कर्तुत्व महान असणारे दिनेश यांच्यामध्ये राजकारणातील व समाजकारणातील गुण आहेत. सध्या एलएलबी च्या शिक्षण पूर्णत्वाकडे वाटचाल आहे. लवकरच त्यांचे लॉ शिक्षण पूर्ण होणार आहे. असे उच्चशिक्षित व उद्योग व्यवसायामध्ये नाव असलेले दिनेश धाईंजे यांच्यामुळे माळशिरस शहरात व तालुक्यात भारतीय जनता पक्षाला अच्छे दिन येणार आहेत. त्यांच्या निवडीने मित्रपरिवार व नातेवाईक यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सर्व परिचित असणारे सर्व गुणसंपन्न दिनेश धाईंजे यांच्यावर शुभेच्छांचा सोशल मीडियावर धुमाकूळ सुरू आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

