बजरंगबली हनुमानाच्या भक्ताच्या मदतीला रामराज्याच्या जनता दरबारात रामाचा धावा…
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी साक्षात पांडुरंगाचं आयुष्य बदलून टाकले
खुडूस ( बारामती झटका)
कुस्ती क्षेत्रामध्ये बजरंगबली हनुमानाला अनन्य साधारण महत्व आहे. कुस्तीचा आखाडा असो किंवा जंगी कुस्त्यांचे भव्य मैदान असो, प्रथम हनुमंतरायाला नमन करून कुस्ती मल्लविद्येला सुरुवात केली जाते. पैलवान कितीही मोठा झाला तरी कुस्तीचे दैवत हनुमंतरायाचा कधीच विसर पडत नाही. बजरंग बली हनुमंतरायाच्या निस्सीम भक्ताच्या मदतीला रामाचा धावा व्हावा, असा प्रत्यय माळशिरस तालुक्यातील खुडूस गावचे पै. पांडुरंग भिवा तरंगे यांच्या जीवनातील प्रसंगावरून येत आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी साक्षात पांडुरंगाच आयुष्य बदलून टाकले आहे.
खुडूस गावातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील पांडुरंग भिवा तरंगे प्रतिकूल परिस्थितीतही खुडूस गावातील गोदबा पाटील कुस्ती केंद्रात व्यायामाचे व कुस्तीचे धडे वस्ताद महादेवराव ठवरे, वस्ताद बापूराव ठवरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेऊ लागले. दिवसेंदिवस कुस्ती क्षेत्रात प्रगती पथावर कुस्ती सुरू होती. तरंगे परिवारातील सर्वांना पांडुरंगाचा अभिमान वाटतो. मात्र, गेल्या दोन वर्षापूर्वी त्यांना घरामध्ये सर्पदंश झालेला होता. अकलूज येथे पांडुरंग यांच्यावर उपचार करून पांडुरंगाला जीवदान मिळाले. परिवारातील सदस्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र सर्पदंश एवढा जोरात होता त्या ठिकाणी जखम झालेली होती. त्यामुळे पांडुरंग यांची कुस्ती बंद झालेली होती. ते घरामध्ये अंथरणावर पडून राहिले होते. दवाखान्याचा चार ते पाच लाख रुपये डॉक्टरांनी ऑपरेशनचा खर्च सांगितलेला होता. ऑपरेशन नाही केले तर पाय कट करून जखम भरून येईल येवढाच पर्याय होता.
घरची परिस्थिती गरिबीची असल्याने पांडुरंगाचे ऑपरेशन करणे तरंगे परिवाराला शक्य नव्हते, ते हतबल झालेले होते. अशा कठीण प्रसंगी बजरंगबली हनुमान रायाचा भक्त पांडुरंग यांच्या मदतीला रामराज्याच्या दरबारात रामाचा धावा व्हावा, अशा पद्धतीने भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी साक्षात पांडुरंगाचे आयुष्य बदलून टाकलेली आहे.
भिवा तरंगे यांनी माळशिरसचे नातेवाईक प्रगतशील बागायतदार पांडुरंग देशमुख यांच्या साह्याने भाजपा किसान मोर्चाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सरगर यांची भेट घेऊन संपूर्ण परिस्थिती सांगितलेली होती. बाळासाहेब सरगर यांनी पांडुरंग देशमुख आणि भिवा तरंगे त्यांच्या समवेत माळशिरस येथील शासकीय विश्रामगृहामध्ये जनता दरबारात लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची भेट घेऊन संपूर्ण परिस्थिती सांगितली.
आमदार यांनी तात्काळ मुंबई येथील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये संपर्क साधून पांडुरंग यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्याच्या हालचाली सुरू केलेल्या होत्या. त्याप्रमाणे रिलायन्स हॉस्पिटल मूंबई येथे शनिवारी दि. ६ ऑगस्ट रोजी पांडुरंगाच्या पायावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. सध्या पांडुरंग सुखरूप आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर तरंगे परिवारातील सदस्यांच्या चेहऱ्यावर आनंद तरळत होता. तर पांडुरंगाच्या चेहऱ्यावर उज्वल भविष्य दिसत होते. पुन्हा पांडुरंग जोमाने कुस्तीचे व व्यायामाचे धडे घेण्यासाठी सज्ज होणार आहे.
माळशिरस तालुका पूर्वीपासून कुस्ती शौकीन म्हणून ओळखला जातो. माळशिरस, निमगाव मगराचे, खुडूस, फोंडशिरस, नातेपुते, पिलीव, वेळापूर, अकलूज, सदाशिवनगर अशा गावांसह अनेक ठिकाणी तालमीत कुस्तीची परंपरा जोपासलेली होती. माळशिरस तालुक्यातील अनेक मल्लांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. महाराष्ट्र केसरी पै. छोटा रावसाहेब मगर, पै. तानाजी बनकर यांनी माळशिरस तालुक्याची मान उंचावलेली आहे. अनेक पैलवानांनी शिवछत्रपती पुरस्कार व इतर पुरस्कार मिळविलेले आहेत. दिवसेंदिवस माळशिरस तालुक्यात कुस्तीची परंपरा जोमाने वाढत आहे.
आ. राम सातपुते आणि माळशिरस तालुक्यातील कुस्ती शौकीन यांचे लोकप्रतिनिधी होण्याअगोदर वेगळे नाते निर्माण झालेले होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांची सीएम चषक कुस्ती स्पर्धा माळशिरस तालुक्यात खुडूस येथे आयोजित केलेली होती. त्यावेळेस राम सातपुते यांनी गोदबा पाटील कुस्ती केंद्र मध्ये सीएम चषक कुस्ती स्पर्धा घेतली होती. त्यावेळचे महाराष्ट्र केसरी बालारफी शेख यास ५१ हजार रोख बक्षीस देऊन सन्मान केलेला होता. त्यावेळेस भविष्यात गोदबा पाटील कुस्ती केंद्रास सहकार्य करू, असे आश्वासन दिलेले होते. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले, याचाही प्रत्यय लोकप्रिय आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्याचे लोकप्रतिनिधी झाल्यानंतर गोदबा पाटील कुस्ती केंद्रास आमदार फंडातून मॅट दिलेले आहे.
माळशिरस तालुक्यातील अनेक ठिकाणी कुस्ती केंद्र सुरू आहेत. अशा ठिकाणी रात्री अपरात्री पैलवानांना अडचण येऊ नये यासाठी हायमास्ट दिवे दिलेले आहेत. तालुक्यातील पैलवान व कुस्ती शौकीन यांचे आणि लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचे अतूट नाते बनलेले आहे. पै. पांडुरंग तरंगे यांच्यावर चार लाख रुपयांची मोफत शस्त्रक्रिया करून कुस्ती क्षेत्रात प्रतिकूल परिस्थितीत पैलवानांना दिलासा देण्याचे काम आमदार राम सातपुते यांनी केलेले असल्याने कुस्ती शौकिनांना लोकप्रिय आमदार राम सातपुते यांच्या कार्याचा अभिमान वाटतो.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng