स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने अभाविपने काढली माळशिरस शहरात ३७५ फूट तिरंगा पदयात्रा
माळशिरस (बारामती झटका)
आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व गोपाळराव देव प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने भव्य ३७५ फूट तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. यावेळी माळशिरस शहर पोलीस निरीक्षक गायकवाड साहेब, अभाविपचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघटनमंत्री अभिजित पाटील, हनुमान शिक्षण संस्थेचे जनरल सेक्रेटरी मिलिंद कुलकर्णी, जिल्हा परिषद सदस्य के. के. पाटील, मुख्याध्यापक कांबळे सर, अभाविप प्रदेश सहमंत्री रोहित राऊत, माजी सैनिक सुरेश तोरसे, अभाविप जिल्हा संयोजक पार्थ तेरकर आदी उपस्थित होते.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून अभाविप प्रदेश संघटन मंत्री श्री. अभिजीत पाटील हे उपस्थित होते. यावेळी बोलताना अभिजीत पाटील म्हणाले की, “स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आपण सर्वांनी मोठ्या उत्साहात सहभागी होऊन स्व-चेतना जागृत करून समाज व राष्ट्र निर्मितीत आपले योगदान द्यावे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात शहिद झालेल्या क्रांतिकारक, स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली वाहावी.”
या पदयात्रेचे नागरिक, व्यापारी यांनी मोठ्या उत्साहात पुष्पवृष्टी, फटाके फोडून स्वागत केले. या पदयात्रेत १५६२ विद्यार्थी, विद्यार्थीनी, प्राध्यापक व नागरिक उपस्थित होते. या पदयात्रेसाठी काटकर सर, देशपांडे सर, वाघमोडे सर, सुळ सर, धुमाळ मॅडम, दिग्विजय देशमुख, विनायक क्षिरसागर, शुभम पाटील, शुभम होळ, हितेश पुंज, सचिन पारवे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng