संभाजी ब्रिगेड ने वरूण सरदेसाई यांचे केले स्वागत
सोलापूर (बारामती झटका)
यावेळी सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकाबाबत चर्चा झाली. संभाजी ब्रिगेड आणि युवा सेना सदर निवडणुका एकत्रित लढणार असल्याची अधिकृत घोषणा वरूण सरदेसाई यांनी संभाजी ब्रिगेड युवासेना संयुक्त पत्रकार परिषदेत केली.
सदर बैठकीनंतर झालेल्या चर्चेप्रमाणे संभाजी ब्रिगेडतर्फे सोलापूर विद्यापीठ सिनेट निवडणूक निर्णय अधिकारी श्रमिक शाह यांना सदस्य नोंदणी व याद्या अद्यावत करण्यात झालेल्या गोंधळाबाबत निवेदन देण्यात आले. “बी” फार्म बाबत सर्व पदवीधरांना माहिती पोहोचवण्यासाठी योग्य प्रसिद्धी सोलापूर विद्यापीठातर्फे देण्यात आली नाही. त्यामुळे पदवीधर नोंदणी पन्नास टक्क्यांनी कमी झाले असल्याचे मनोजकुमार गायकवाड यांनी निदर्शनास आणून दिले. जुनी नावे विद्यापीठाने ऑनलाईन प्रणालीत स्वतः नोंदवून घ्यावीत किंवा प्रत्येक पदवीधरांना वैयक्तिक पत्राद्वारे संपर्क साधून माहिती द्यावी. तोपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी संभाजी ब्रिगेड तर्फे करण्यात आली आहे.
यावेळी शिवसेनेतर्फे विस्तारक शरदजी कोळी, उत्तमजी आयवळे, जिल्हाध्यक्ष गणेशजी वानकर, स्वप्निल वाघमारे, सचिनजी बागल, गणेश इंगळे, महेश देशमुख इत्यादी व संभाजी ब्रिगेड तर्फे सोमनाथ राऊत जिल्हाध्यक्ष सोलापूर विभाग, सचिन जगताप जिल्हाध्यक्ष सोलापूर पंढरपूर विभाग, सुहास टोणपे, विजयकुमार परबत जिल्हा संघटक, भारत लटके तालुका कार्याध्यक्ष, सचिन खुळे शहराध्यक्ष टेंभुर्णी, हिम्मत किर्ते, दिलीप पाटील इत्यादी संभाजी ब्रिगेडचे तसेच शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Your humor made this topic so engaging! For further reading, click here: DISCOVER MORE. Looking forward to the discussion!