आजीबाईच्या अंगणामध्ये श्रीकृष्णाच्या काळातील गोकुळ अवतरणार आहे..
गोफण चालविणे, ट्रॅक्टर चालवणे, ग्रामपंचायत चालवणे अशी विविध कामे करून नातींचा सन्मान करणाऱ्या आजीच्या नातीच्या चिरंजीव व कन्येच्या बारशाच्या कार्यक्रमाचे आयोजन..
तरंगफळ (बारामती झटका)
तरंगफळ ता. माळशिरस, येथील प्रगतशील बागायतदार व विद्यमान ग्रामपंचायत सदस्या श्रीमती जगूबाई जानकर संपूर्ण महाराष्ट्राला महिला दिनाच्या माध्यमातून सुपरिचित आहेत. गोफण चालविणे, ट्रॅक्टर चालविणे, ग्रामपंचायत चालविणे, नातींनी शिक्षणामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर नातींचा गुणगौरव करून सन्मान करणाऱ्या आजींच्या नातींच्या चिरंजीव व कन्येच्या बारशाच्या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार दि. 7/9/2023 रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. सदरचा कार्यक्रम निसर्गराजावर अवलंबून आहे. जर वरूण राजाने कृपाशीर्वाद केला तर सदरचा कार्यक्रम 03 ते 05 या वेळेमध्ये होणार आहे. श्रीकृष्ण अष्टमी काल झालेली आहे, आज गोपाल काला असतो. अशा मंगलमय प्रसंगी आजीबाईच्या अंगणामध्ये श्रीकृष्णाच्या काळातील तरंगफळ, जानकर वस्ती येथे गोकुळ अवतरणार आहे. तरी सर्वांनी चिरंजीव व कन्येच्या नामकरण सोहळ्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन सौ. ऋतुजा व श्री. कुलदीप गोरख जानकर, सौ. हर्षदा व श्री. मंगेश अरुण पिंगळे, सौ. प्राजक्ता व श्री. सागर परमेश्वर बनसोडे अशा परिवाराकडून करण्यात येत आहे.
तरंगफळ येथे विठोबा जानकर व जगुबाई जानकर यांनी शेती व मेंढपाळ व्यवसाय करून प्रतिकूल परिस्थितीत आपला संसार सुखाचा व समाधानाचा केलेला होता. सुरुवातीपासून जगूबाई जानकर धार्मिक वृत्तीच्या व धाडसी होत्या. शेतामधील अनेक कामे आपल्या पती राजांना मदत म्हणून करीत असत. पूर्वीच्या काळी लाईटची सुविधा नव्हती. इंजिनवर पिकांना पाणी दिले जात होते. त्यावेळेस इंजिनसुद्धा चालू करून पिकांना पाणी देत होत्या. दोघांनी प्रपंच व्यवस्थित करून समाजामध्ये वेगळा आदर्श निर्माण केलेला होता. जगुबाई जानकर यांनी पती असताना मायाक्का देवीचे मंदिर उभा करून सवाष्णींचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात केलेला होता. कार्यक्रमासाठी येणाऱ्या प्रत्येक जाती-धर्मातील महिलेला साडीचोळी, ओटीचे सामान दिलेले होते. टेम्पो भरून साड्या आणलेल्या होत्या.
जगुबाई जानकर यांना एक मुलगा गोरख व मुली आहेत. मुलाचा एसटी अपघात होऊन पाय मोडलेला होता, व्यवस्थित झाल्यानंतर आपण स्वतः अपंग आहे. अपंगांच्या व्यथा जाणून श्री. गोरख जानकर यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील व माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील अपंग सेवाभावी संस्था तरंगफळ येथे सुरू करून अपंग बांधवांची अडीअडचणीची कामे करण्याचे काम सुरू आहे. सध्या गोरख जानकर यांच्याकडे प्रहार संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष पद आहे.
श्रीमती जगुबाई जानकर सामाजिक, राजकीय कार्यामध्ये अग्रेसर असतात. शेतामध्ये अजूनसुद्धा काम करीत असतात. अपंग संघटनेच्या व इतर कार्यक्रमाच्या वेळीसुद्धा आवर्जून उपस्थित असतात. हर्षदा, प्राजक्ता व वैष्णवी या तीन नाती व कुलदीप नातू. या सर्वांनी शिक्षणामध्ये उल्लेखनीय कार्य केल्यानंतर आजीबाई कोडकौतुक करून लाड करीत असतात. जानकर परिवाराची तिसरी पिढी सुसंस्कृत आहे. सौ. ऋतुजा कुलदीप जानकर ह्या बीएससी ऍग्री आहेत. सौ. हर्षदा मंगेश पिंगळे व सौ. प्राजक्ता सागर बनसोडे ह्या दोघींचीही बी. फार्मसी झालेली आहे. अविवाहित असणारी वैष्णवी सुद्धा उच्च शिक्षण घेत आहे.
आजीबाई बघता बघता पणजी झालेल्या आहेत. त्यांच्या नातींच्या चिरंजीव व कन्येच्या नामकरण सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी सर्व मित्र परिवार व नातेवाईक यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे जानकर, पिंगळे व बनसोडे परिवार यांच्या वतीने नम्र विनंती करण्यात येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Kihana Nourani