छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले महाराज यांची सुळ पाटील परिवारांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट..

मोरोची (बारामती झटका)
महाराष्ट्राचे आराध्य दैवत रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट तेरावे वंशज लोकप्रिय खासदार सर्वसामान्य जनता व युवकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणारे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी माळशिरस पंचायत समितीचे उपसभापती युवा नेते किशोरभैय्या सुळ पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
छत्रपती उदयनराजे महाराज यांचे मोरोची, ता. माळशिरस येथील सुळ पाटील यांच्या निवासस्थानी जंगी स्वागत करण्यात आले. प्रथम घरातील महिला भगिनींनी औक्षण केले. छत्रपती उदयनराजे यांचा सन्मान मोरोची गावचे माजी सरपंच व ज्येष्ठ नेते श्री तानाजीराव सुळ पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.


यावेळी उपसभापती युवा उद्योजक किशोरभैय्या सुळ पाटील, उदयनराजे महाराज यांचे विश्वासू सहकारी श्री श्री सद्गुरू साखर कारखान्याचे संचालक उत्तमराव खांडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng