ह. भ. प. सौ. संजीवनीताई शिंगाडे यांचे माळशिरस येथे सुश्राव्य कीर्तन होणार….

स्वर्गीय सौ. संगीता नामदेव शिंदे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन…
माळशिरस (बारामती झटका)
स्वर्गीय सौ. संगीता नामदेव शिंदे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त सुप्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. संजीवनीताई शिंगाडे महाराज यांचे शुक्रवार दि. 08/09/2023 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये शिंदे वस्ती 58 फाटा माळशिरस येथे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. किर्तनानंतर पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. नामदेव जगन्नाथ शिंदे, श्री. अमोल नामदेव शिंदे, सौ. प्राजक्ता अमोल शिंदे, चि. समर्थ अमोल शिंदे, सौ. रूपाली बबन फुले विडणी, अश्विनी सचिन बनकर यांच्यावतीने करण्यात येत आहे.


सौ. संगीता नामदेव शिंदे यांचा सुसंस्कृत व मनमिळावू स्वभाव होता. त्यांना अध्यात्माची व सामाजिक कार्याची आवड होती. शिंदे परिवार यांनी दुसऱ्या पुण्यस्मरणानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडकी येथील शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले आहे. यावेळी जिल्हा परिषद मांडकी शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व बँकेतील स्टाफ उपस्थित होता.
अमोल नामदेव शिंदे यांनी आपल्या मातोश्रींच्या निधनानंतर त्यांनी दिलेले संस्कार आचरणात आणून अमोल समाजामध्ये वावरत असताना त्याचा प्रत्यय येतो. सध्या ते बँकेमध्ये नोकरीस आहेत. मातोश्रीच्या स्मृती समाज उपयोगी कार्यातून जपण्याचे त्यांचे अनमोल काम सुरू आहे. अमोल शिंदे यांच्या शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाच्या कार्यक्रमाचे विद्यार्थी, शिक्षक, पालक व उपस्थित मान्यवर यांच्यामधून कौतुक केले जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng