ताज्या बातम्यासामाजिक

आनंद भंडारी यांची आयएएस पदी निवड

मुंबई (बारामती झटका)

महाराष्ट्र विकास सेवेतील उत्कृष्ट अधिकारी असलेले आनंद भंडारी यांची महाराष्ट्र केडरमध्ये आयएएस पदी निवड झाली. महाराष्ट्र राज्यातील सर्वच अधिकारी सेवेची किमान २० वर्ष सेवा पूर्ण केलेल्या व मागील १० वर्षाचे गोपनीय अहवाल ए+ असलेल्या अधिकाऱ्यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मार्फत परीक्षा व मुलाखत होऊन भारतीय प्रशासकीय सेवेसाठी निवड केली जाते. यात आनंद भंडारी हे गुणानुक्रमे राज्यातून अव्वल ठरले.

आनंद भंडारी यांनी आपल्या शासकीय सेवेला २००१ मध्ये नायब तहसिलदार सातारा येथून सुरुवात केली. त्यानंतर पुन्हा राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन ते महाराष्ट्र विकास सेवेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा गटविकास अधिकारी वर्ग १ च्या पदासाठी निवडले गेले. त्यानंतर आनंद भंडारे यांनी २००२ ते २००३ – परिविक्षाधीन गट विकास अधिकारी, सातारा जिल्हा परिषद, २००३ ते २००७ – गट विकास अधिकारी, पंचायत समिती खेड, पुणे जिल्हा, २००७ ते २०११ – गट विकास अधिकारी, पंचायत समिती जुन्नर, २०११ ते २०१४ – उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पुणे, २०१४ ते २०१८ – उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, सातारा, २०१८ ते २०१९ – प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, अमरावती, २०१९ ते २०२१ – अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड, २०२१ ते २०२२ पर्यत सेवा केली.

सध्या ते संचालक पंचायत राज च्या पदावर कार्यरत आहेत. शासनाच्या विविध योजना ग्राम स्तरावर निश्चित व शाश्वत स्वरूपात अंमलबजावणी करण्यात त्यांचा विशेष कल आहे. ग्रामपंचायत प्रशासन, पंचायत राज व्यवस्था सक्षमीकरण, मृद व जलसंधारण, पर्यावरण रक्षण व संवर्धन, स्वच्छ भारत अभियान, प्रशिक्षण व क्षमता बांधणी, विविध विकास योजनांची अंमलबजावणी, शासनाच्या विविध अभियानांची अंमलबजावणी इ. क्षेत्रात काम केले.

श्री. आनंद भंडारी याच्या कामाची शासनाने दखल घेऊन २०१८ साली मा. राज्यपाल यांच्या हस्ते गुणवंत अधिकारी पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. श्री. भंडारी हे राहुरी कृषी विद्यापीठाचे कृषी पदवीधर असून उत्कृष्ट कबड्डी पट्टू ही आहेत. उमेद चे सहसंचालक परमेश्वर राऊत, पुणे आयुक्तालयातील उपायुक्त विजय मुळीक, पंचायत राजचे उप संचालक श्याम पटवारी तसेच राज्यातील अनेक अधिकरी व नागरिकांनी आनंद भंडारी यांचे अभिनंदन केले…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

16 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button