आपण कोण आहोत हे समजावून घेणे आवश्यक – नामदेव भोसले
दौंड (बारामती झटका)
महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढती गुन्हेगारी चिंत्ताजनक आहे, ही गुन्हेगारी थांबविण्यासाठी पोलीसांची दमछाक होत आहे. असे मत आदिवासी समाजसेवक नामदेव भोसले यांनी पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड येथील पोलिसांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
आयुष्य जास्त सुंदर आहे. भविष्याचे चित्र काढण्यापेक्षा वर्तमान काळातील चित्र पूर्ण करावं, जीवनामध्ये जगताना प्रत्येकाने निस्वार्थ जगाव तरच आपण दुसऱ्यांना आनंदात ठेवू शकतो. आपल्या स्वतःच्या कायमस्वरूपी मागण्या करण्यापेक्षा पिढीतांचे दुःख कमी करण्याकरिता काहीतरी देऊन पहावं, आयुष्य जास्त सुंदर वाटेल, समाधानी वाटेल. आपल्याला कोण हवंय यापेक्षा आपण कोणाला हवे आहोत हे सुद्धा कधीतरी पहावं, आपल्याला जास्त सुंदर वाटतं म्हणून. अंधाऱ्या जीवनातील आकाशातले तारे कधीच मोजून होत नाही व आपल्या गरजा कधीच संपत नाहीत. शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं नाही तर, या विखुरलेल्या जगात आपण कधीच समाधानी राहू शकणार नाही. प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड येथे प्रमुख वक्ते म्हणून गुन्हे व त्याचे दैनंदिन जीवनावर होणारे परीणाम या विषयावर पोलीसांना मार्गदर्शन करताना समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले बोलत होते.
यावेळी नानवीज पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य नंदकुमार ठाकूर म्हणाले की, ज्यांनी निस्वार्थपणे पिढीतांची सेवा करण्याकरिता आपले आयुष्य वाहुन घेतले आहे, अशा समाजसेवकांचे विचार निश्चितपणे आमच्या पोलीस प्रशिक्षण विद्यार्थी व महाराष्ट्र पोलीसांठी प्रेरणादायी ठरतील असे मला वाटते. नामदेव भोसले यांचे कामाचे व विचारांचे कौतुक महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यात केले जात आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले, नानवीज प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख प्राचार्य नंदकुमार ठाकूर, उप प्राचार्य रघुनाथ शिंदे, पोलीस निरीक्षक, विकास गावंड, राजेंद्र भोसले, स्वप्रित भोसले व पोलीस प्रशिक्षण विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.