आरोग्यदूत राम सातपुते यांच्या सहकार्याने माहेरच्या माणसांमुळे सासरच्या लोकांना आर्थिक दिलासा…

खंडाळीच्या पताळे पाटलांची लेक पटवर्धन कुरवली गावच्या सुनेला सख्ख्या भावासारखे रामभाऊ मदतीला धावून आले….
खंडाळी (बारामती झटका)
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार आरोग्यदूत रामभाऊ सातपुते यांच्या प्रयत्नांना मोठे यश आलेले आहे. पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरवली गावच्या पाटील परिवाराला मोठा आर्थिक दिलासा मिळाला. रुग्णालयाकडून १० लाख २५ हजार रुपये परत मिळाले. आरोग्यदूत राम सातपुते यांच्या सहकार्याने माहेरच्या माणसांमुळे सासरच्या लोकांना आर्थिक दिलासा मिळालेला आहे.
माळशिरस तालुक्यातील खंडाळी गावच्या पताळे पाटलांची लेक पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरवली गावच्या सुनेला सख्ख्या भावासारखे रामभाऊ मदतीला धावून आलेले आहेत..
पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरवली गावातील सौ. अश्विनी सोमाजीराव पाटील यांच्या मेंदूच्या ऑपरेशन साठी योजनेत बसत असताना सुद्धा पुणे येथील KEM हॉस्पिटल ने १० लाख २५ हजार रुपये बिल घेतले होते.
सौ. अश्विनी यांचे माहेर खंडाळी गावातील पताळे पाटील परिवारात असल्याने माहेर च्या मंडळींनी रामभाऊ सातपुते यांना संपर्क केला होता. सदरच्या विषयात रामभाऊ सातपुते यांनी हॉस्पिटल प्रशासनाला धारेवर धरले. पुणे येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयात विषय लावून धरला आणि शेवटी
पुणे येथील KEM हॉस्पिटल ने १० लाख २५ हजार रुपयांचा चेक सौ. अश्विनी सोमाजीराव पाटील यांना दिला.

पाटील परिवारावर आलेल्या कठीण प्रसंगी मदतीचा हात देत राम सातपुते यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे रुग्णालयाला रुग्णाचे १० लाख २५ हजार रुपये परत द्यावे लागले. या महत्त्वपूर्ण मदतीमुळे पाटील परिवाराला मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून, त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलले आहे.
संकटाच्या काळात सामान्य नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, हीच लोकसेवेची खरी भावना आहे. पाटील परिवाराच्या अडचणीच्या काळात राम सातपुते यांनी पुढाकार घेत संबंधित रुग्णालयाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे रुग्णालयाकडून १० लाख २५ हजार रुपये परत मिळाल्याने कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला.
पाटील परिवाराला मिळालेला हा दिलासा म्हणजे संकटाच्या काळात योग्य पाठपुरावा आणि मदतीसाठी केलेल्या प्रयत्नांचे फलित आहे.
राम सातपुते यांच्या पुढाकारामुळे पाटील परिवाराला मिळाला दिलासा मिळाला असून १० लाख २५ हजार रुपये परत मिळाल्याने कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे.
“सामान्य माणसाच्या चेहऱ्यावरचे हास्य हेच आमच्या कामाचे खरे समाधान आहे. जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि गरजूंना मदत करण्यासाठी सदैव कटिबद्ध आहोत,”
-मा.आ राम सातपुते
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



