आरोग्यदूत आमदार राम सातपुते यांचा माळशिरस येथील बंडगर व नातेपुते येथील देवकाते परिवारांना आभाळाएवढ्या संकटात आधार..

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार यांचे रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असणारी सर्व जाती धर्माची सेवा ठरत आहे.
माळशिरस (बारामती झटका)
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार यांचे रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असणारी सर्व जाती धर्मातील अडचणीतील लोकांची सेवा ठरत आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या सहकार्याने व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दमदार आमदार राम सातपुते यांची दमदार विकासकामांबरोबर गोरगरीब व सर्व सामान्य जनतेची दमदार आरोग्यसेवा सुरू आहे.
माळशिरस वळकुंदे मळा येथील शिवाजी बंडगर व नातेपुते येथील समीप चंद्रकांत देवकाते या दोघांचे पायाचे ऑपरेशन संचेती हॉस्पिटल, पुणे येथे मोफत करून दिले आहे. गरीब परिस्थितीमुळे रखडलेले पायाचे ऑपरेशन आरोग्यदूत आमदार राम सातपुते यांनी मोफत ऑपरेशन करून बंडगर व देवकाते परिवारांना दिलासा दिलेला आहे.

माळशिरस विधानसभा मतदारसंघात लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी जनता दरबार सुरू केला आणि सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला हक्काचे व्यासपीठ मिळाले. थेट आमदार यांच्याशी संपर्क साधण्यास जनसामान्य जनतेला स्वतःच्या अडचणी सांगून सोडवून घेत आहेत. आमदार साहेबांनी आर्थिक अडचणी व गरीबी जवळून पाहिलेली असल्याने गोरगरिबांच्या मदतीला धावून जाण्याचे काम सुरू आहे. विकासकामांतून दमदार आमदार असणारे राम सातपुते गोरगरीब जनतेचे आरोग्यदूत झाले. रुग्णांची सेवा करीत असताना कोणत्याही जाती धर्माला दुजाभाव केलेला नाही. सर्व जाती धर्माची मनोभावे रुग्ण सेवा करण्याचे काम सुरू आहे. गोरगरिबांच्या आर्थिक अडचणीच्या वेळी नातेवाईक व समाजातील कोणीही उपयोगी आलेले नाहीत. अशावेळी आरोग्यदूत आमदार राम सातपुते यांनी सहकार्य केलेले असल्याने आमदार राम सातपुते यांच्याविषयी सहानुभूती व कृतज्ञता व्यक्त केली जात आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.