ताज्या बातम्या

मळोली येथील धर्मराज दामोदर जाधव यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.

मळोली (बारामती झटका)

मळोली ता. माळशिरस येथील प्रगतशील बागायतदार धर्मराज दामोदर जाधव यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 68 व्या वर्षी शनिवार दि. 02/12/2023 रोजी मिरज येथे उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. त्यांच्यावर मळोली येथील वैकुंठभूमित शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, मुलगी जावई, नातवंडे असा परिवार आहे.

धर्मराज जाधव यांचा मनमिळावू स्वभाव होता‌. त्यांनी धानोरे विविध कार्यकारी सेवा सोसायटीवर चेअरमन व शिवशंकर विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटी मळोली येथे संचालक पदावर काम केलेले होते. समाजामध्ये राजे या नावाने ते सुपरिचित होते. कायम अंगामध्ये तीन गुंड्याचा शर्ट, पायजमा व टोपी असा पेहराव होता.

त्यांच्या दुःखद निधनाने जाधव परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व जाधव परिवार यांना दुःखातून सावरण्याचे बळ देवो, हीच बारामती झटका परिवार यांच्याकडून भावपूर्ण आदरांजली आहे. रक्षाविसर्जन (तिसऱ्याचा) कार्यक्रम सोमवार दि. 04/12/2023 रोजी सकाळी साडेसात वाजता मळोली वैकुंठ स्मशानभूमी येथे होणार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

One Comment

  1. Good day I am so grateful I found your website, I really found you by mistake, while I was browsing on Yahoo for something else, Nonetheless I am here now and would just like to say kudos for a marvelous post and a all round exciting blog (I also love the theme/design), I don’t have time to browse it all at the minute but I have bookmarked it and also included your RSS feeds, so when I have time I will be back to read a great deal more, Please do keep up the excellent job.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button