ताज्या बातम्याराजकारण

५१ टक्के मतांची लढाई जिंकण्यासाठी सुपर वॉरियर्सची नियुक्ती करावी – मुरलीधर मोहोळ

भाजपच्या महाविजय २०२४ – जनसंपर्क ते जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने सांगोल्यात बैठक संपन्न

सांगोला (बारामती झटका)

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघाचा प्रवास करीत आहेत. ७ व ८ डिसेंबर रोजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून भाजपच्या महाविजय २०२४ – जनसंपर्क ते जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेशी संवाद साधणार आहेत. राज्यात भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे यापुढील सर्व निवडणुका जिंकून भाजप नवा विक्रम प्रस्थापित करेल. देशात पुन्हा भाजपची सत्ता आणण्यासाठी तसेच ५१ टक्के मतांची लढाई जिंकण्यासाठी तीन बूथसाठी प्रत्येकी एका सुपर वॉरियर्सची नियुक्ती करावी अशा सूचना भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी दिल्या.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे याच्या महाविजय २०२४ – जनसंपर्क ते जनसंवाद यात्रेच्या नियोजनाची बैठक सांगोल्यात पार पडली. या बैठकीला भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, पश्चिम महाराष्ट्र संघटन सरचिटणीस मकरंद देशपांडे, खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार राम सातपुते, माढा लोकसभा निवडणुक प्रमुख माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, जिल्हा सरचिटणीस सचिन शिंदे, शशिकांत चव्हाण, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप, माढा लोकसभा संयोजक राजकुमार पाटील, योगेश बोबडे, के. के. पाटील, गणेश चिवटे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा ज्योती पाटील, जिल्हा सरचिटणीस धनश्री खटके, जयकुमार शिंदे, माऊली हळनवर यांच्यासह भाजपचे कोअर कमिटी सदस्य, विधानसभा निवडणूक प्रमुख, प्रदेश पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, जिल्हा मोर्चा आघाडी प्रमुख, तालुका पदाधिकारी व विस्तारक उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, गेल्या चार वर्षांत सातत्याने भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला बळ वाढावे यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला माढा मतदारसंघ भाजपचा झाला आहे. पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम करीत आहोत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यावेळी सर्वच पदाधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे. तीन बूथसाठी प्रत्येकी एका सुपर वॉरियर्सची नियुक्ती करावी अशा सूचना खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी दिल्या.

भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 9 वर्षात समाजातील गरीब आणि वंचित घटकांच्या कल्याणासाठी क्रांतिकारी पावले उचलली आहेत. माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवून मतदारांना दिलेला शब्द पाळाला आहे. खासदार निंबाळकर यांनी मतदारसंघात कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून विकास कामांना चालना दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, पश्चिम महाराष्ट्र संघटन सरचिटणीस मकरंद देशपांडे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button