ताज्या बातम्याराजकारण

“अहो, ऐकलं का, काय सांगतायं ?”, म्हणे राजकारणातील प्रसिद्ध असलेल्या बंगल्याला दोन दरवाजे पडणार वाटतं…

माळशिरस (बारामती झटका)

समाजामध्ये आपण पाहतो प्रेमासाठी वाट्टेल ते. सर्व काही माफ केले जाते मात्र, राजकारणात वेगळी परिस्थिती असते. नातीगोती वेगळी होतात, तशीच परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणात घडत चाललेली आहे. राजकारणातील प्रसिद्ध असलेल्या बंगल्याला दोन दरवाजे पडणार असल्याची नवरा बायकोची चर्चा होती, अहो, ऐकलं का ? राजकारणातील प्रसिद्ध असलेल्या बंगल्याला दोन दरवाजे पडणार आहेत. या वाक्याने राजकारणात मोठी खळबळ उडणार आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय उलथापालथ मोठ्या प्रमाणात झालेली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षात फूट पडलेली आहे. काँग्रेस मधून फुटून भाजपमध्ये आलेले आहेत. मात्र, भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव ठाकरे व अन्य पक्षात जाण्याचे प्रमाण नगण्य आहे.

सध्या लोकसभेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी मिळवण्याकरता राजकीय घराणे आटापिटा करीत आहेत. अनेक ठिकाणी नातेसंबंधांमध्ये निवडणुका लागत आहे तर काही ठिकाणी प्रतिष्ठेच्या निवडणुका होत आहेत. यासाठी काही ठिकाणी घराण्याची प्रतिष्ठा सुद्धा पणाला लावली जात आहे‌. राजकारणात एकाच घराण्याला बंगल्याच्या रूपाने नाव असेल तर अशाही घराण्यामध्ये राजकीय वादविवाद सुरू आहेत. अशा मधूनच बंगल्याला दोन दरवाजे पडणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. बाहेर चौकात बाजारात असलेली चर्चा घरामध्ये भांडी घासणाऱ्या महिला सुद्धा आपल्या पतीला अहो ऐकलं का म्हणे, राजकारणातील प्रसिद्ध असलेल्या बंगल्याला दोन दरवाजे पडणार वाटतं. एका दरवाज्यातून एक पक्ष आणि दुसऱ्या दरवाज्यातून दुसरा पक्ष वहिवाट करणार अशी चर्चा सुरू आहे. लवकरच खरंच एका बंगल्याला दोन दरवाजे पडल्यानंतर दोन दरवाज्याचे फोटो सहित बातमी प्रसारित केली जाईल तोपर्यंत चर्चा आहे. कधी कधी चर्चेतून मार्ग निघतो आणि चर्चा निष्फळ सुद्धा ठरू शकते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button