…. अखेर सातारच्या सिंहांचे मनोमिलन, उर्वरित सिंहांचे रिंग मास्टर देवाभाऊ…
“एकच वादा अजितदादा” जो वादा किया है महायुती धर्म का, वो निभाना पडेगा…
मुंबई (बारामती झटका)
महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्यासह विविध पक्षांची लोकसभेसाठी महायुती झालेली आहे. लोकसभेच्या जागा वाटपात महायुतीचा धर्म सर्वांनी पाळायचा, असे ठरलेले आहे. लोकसभेच्या उमेदवारीवरून एकमेकांचे जुने वाद उफाळून सोशल मीडियावर धुमाकूळ सुरू आहे. यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रीय नेते अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकप्रतिनिधी व नेते यांची बैठक घेतली. अनेक दिवस सुरू असलेला सातारच्या सिंहांचा वाद मिटून मनोमिलनाच्या दिशेने वाटचाल आहे. “एकच वादा अजितदादा”, जो वादा किया है महायुती धर्म का, वो निभाना पडेगा” या वाक्याची आठवण येत आहे. अखेर सातारच्या सिंहांचे मनोमिलन उर्वरित सिंहांचे रिंग मास्टर उपमुख्यमंत्री भाजपचे नेते देवेंद्रजी फडवणीस उर्फ देवा भाऊ यांच्याकडे असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय सर्कशीमध्ये अनेक हत्ती, उंट, घोडे, माकडे, लांडगे, कोल्हे, सिंह अशा प्रवृत्ती असणारे लोक असतात. सर्कशीमध्ये खऱ्या अर्थाने सिंहाची मोठी जोखीम रिंग मास्टर यांच्यावर असते. तशाच पद्धतीने राजकारणातील सिंहांचे रिंग मास्टर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस उर्फ देवा भाऊ आहेत, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
गतिमान विकासाची दूरदृष्टी असलेले भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या पंतप्रधान पदाची हॅट्रिक करण्याकरता महायुतीतील सर्वच नेते व कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. “अबकी बार 400 पार”, असा नारा देत महाराष्ट्रातील 48 जागांचे लोकसभेच्या निवडणुकीचे जागा वाटप करण्यात आलेले आहे. भाजपने उमेदवारांच्या घोषणा केलेल्या आहेत. असंतुष्ट नेते व कार्यकर्ते यांचे भारतीय जनता पक्ष व भाजपची कार्यप्रणाली व उमेदवार यांच्यावर आक्षेप घेऊन प्रतिमा मलिन करण्याचे काम सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचा धर्म पाळण्याकरता उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते अजितदादा पवार यांनी वेळीच नेते व कार्यकर्ते यांना समज दिली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. लवकरच मनोमिलन झाल्याचे वृत्त प्रसिद्ध होईल. तोपर्यंत वेट अँड वॉच, असे राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना व इतर पक्षांकडून बोलले जात आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.