ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोठी बातमी : माढा लोकसभा मतदार संघात प्रचाराचा नारळ माळशिरस तालुक्यात फुटणार…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह महायुतीतील नेत्यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ होणार…

माळशिरस (बारामती झटका)

लोकसभा निवडणुकीत यंदा सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या माढा लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराचा नारळ एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात फोडला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत माळशिरस येथून प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ केला जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आलेले आहे.

महायुतीचा पश्चिम महाराष्ट्राचा प्रचाराचा नारळ थेट माळशिरस येथून फोडण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी महायुतीचे सर्व बडे नेते उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत हे नीरा नरसिंहपूर येथे असून प्रत्येक निवडणुकीपूर्वी ते आपल्या कुलदैवताचे दर्शन घेत असतात. यंदाही माळशिरस येथील प्रचाराचा नारळ फोडल्यावर देवेंद्रजी फडणवीस हे कुलदैवतेच्या दर्शनाला जाणार आहेत. अजूनही महायुतीमधील अनेक जागांचा तिढा सुटला नसला तरी येत्या दोन दिवसात सर्व उमेदवार निश्चित केले जाणार आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघातून छत्रपती उदयनराजे भोसले महाराज हे भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढविण्याचेही निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून समजते.

पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांच्या बहुतांश जागेवरील निवडणूक तिसऱ्या टप्प्यात होत असल्याने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रचाराचा शुभारंभ केला जाणार आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, रिपाई नेते ना. रामदास आठवले, रयत क्रांती संघटनेचे माजी मंत्री सदाभाऊ खोत, राष्ट्रीय समाज पक्षाचे सरसेनापती माजी मंत्री महादेवराव जानकर यांच्यासह सर्वच महायुतीमधील घटक पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत. प्रचाराचा नारळ थेट माळशिरस येथून फोडला जाणार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

23 Comments

  1. п»їlegitimate online pharmacies india [url=http://indiaph24.store/#]Cheapest online pharmacy[/url] top 10 pharmacies in india

  2. mexican pharmaceuticals online [url=http://mexicoph24.life/#]mexican pharmacy[/url] medicine in mexico pharmacies

  3. tamoxifen men [url=http://nolvadex.life/#]how to prevent hair loss while on tamoxifen[/url] tamoxifen for sale

  4. buy cytotec online fast delivery [url=http://cytotec.club/#]purchase cytotec[/url] buy misoprostol over the counter

  5. buy cipro cheap [url=https://ciprofloxacin.tech/#]where can i buy cipro online[/url] ciprofloxacin generic price

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort