अकलूज येथे मराठा व धनगर समाज बांधवांची आरक्षणासाठी संयुक्त बैठक संपन्न झाली…
मराठा समाजास ओबीसी आरक्षण व धनगर समाजास अनुसूचित जाती व जमाती आरक्षणासाठी महाराष्ट्रातील पहिली दोन्ही समाजाची बैठक संपन्न झाली…
अकलूज (बारामती झटका)
महाराष्ट्रामध्ये मराठा समाजास ओबीसी आरक्षण मिळावे व धनगर समाजास अनुसूचित जाती व जमातीमध्ये समावेश करावा, यासाठी दोन्ही समाजाकडून मोर्चे, आंदोलने, उपोषणे सुरू आहेत.
दोन्ही समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांना आरक्षण मिळणे गरजेचे आहे. मराठा व धनगर समाजामध्ये अनेक लोक मागासलेले आहेत. त्यांची उन्नती व्हावी यासाठी आरक्षणाची गरज आहे. मराठा समाजास ओबीसी आरक्षण व धनगर समाजाचा अनुसूचित जाती व जमातीमध्ये समावेश व्हावा, यासाठी दोन्ही समाजाची महाराष्ट्रातील पहिली बैठक अकलूज येथील शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झालेली आहे.
अकलूज येथे मराठा व धनगर समाज बांधवांची संयुक्त बैठक महाराष्ट्राला दिशा देणारी ठरणार आहे. मराठा समाजाचे अनेक मोर्चे मिळावे, आंदोलने झाली, तशीच धनगर समाज बांधवांची सुद्धा झालेली आहेत.
मराठा समाज बांधव यांच्या समवेत धनगर समाजातील लोणंद-फलटण-पंढरपूर रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष खंडकरी शेतकऱ्यांचे नेते ॲड. सोमनाथ वाघमोडे, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोरभैय्या सुळ पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष आंदोलनवीर अजितभैया बोरकर, धनगर समाजाचे समन्वयक दादासाहेब काळे आदी धनगर समाज बांधव उपस्थित होते. मराठा व धनगर समाजाच्या नेते व कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये सखोल चर्चा करण्यात आली. भविष्यामध्ये रणनीती आखण्याची चर्चा झाली. बैठकीनंतर मराठा व धनगर समाज बांधवांनी घोषणा देऊन मराठा व धनगर समाज एकत्र आहे. याची महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा पणती पेटवण्याचे काम माळशिरस तालुक्यातून झालेली आहे. लवकरच महाराष्ट्रामध्ये मराठा व धनगर समाजाची मशाल पेटण्याची शक्यता आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng