क्रीडाताज्या बातम्यादेशदेश-विदेशविशेष

माळशिरसची सुवर्णकन्या ऋतुजा भोसले हिने आशियाई क्रीडा स्पर्धेत मिश्र दुहेरी सुवर्णपदक पटकाविले…

माळशिरसच्या सुवर्णकन्येने आंतरराष्ट्रीय पातळीवर रोवला मानाचा तुरा…

माळशिरस (बारामती झटका)

आशियाई क्रीडा स्पर्धेत रोहन बोपण्णा आणि माळशिरसची सुवर्णकन्या ऋतुजा भोसले या जोडीने टेनिसच्या मिश्र दुहेरीत सुवर्णपदक पटकावले. भारतीय जोडीने अंतिम फेरीत तैपेई जोडीचा २-६, ६-३, १०-४ असा पराभव केला. भारतीय जोडीने अंतिम सामन्यातील पहिला सेट गमावला होता. मात्र, दुसऱ्या सेटमध्ये रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले यांनी शानदार पुनरागमन करत अखेर सुपर टाय ब्रेकमध्ये सामना जिंकला.

रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले या भारतीय जोडीला पहिल्या सेटमध्ये दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यांना तैपेई जोडीने ६-२ ने पराभूत केले. यानंतर भारतीय जोडीने दुसऱ्या सेटमध्ये शानदार पुनरागमन करत तैपेईच्या अन-शुओ लियांग आणि त्सुंग-हाओ हुआंग या जोडीचा १०-४ असा पराभव करत सामना १-१ असा बरोबरीत सोडवला. त्यानंतर दोघांमधील निर्णय सुपर टाय ब्रेकमध्ये घेण्यात आला, ज्यामध्ये रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले यांनी टेनिसच्या मिश्र दुहेरीत १०-४ असा शानदार स्कोअर करून इतिहास रचला आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

25 Comments

  1. Greetings! I know this is somewhat off topic but I was wondering which blog platform are you using for this website? I’m getting tired of WordPress because I’ve had problems with hackers and I’m looking at options for another platform. I would be fantastic if you could point me in the direction of a good platform.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button