ताज्या बातम्यासामाजिक

अंकोली येथील सौ. विमल रणदिवे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

अंकोली (बारामती झटका) दशरथ रणदिवे यांजकडून

मोहोळ तालुक्यातील मौजे अंकोली येथील रहिवाशी सौ. विमल शिवाजी रणदिवे यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पुण्यातील एका रुग्णालयात निधन झाले. मृत्यू समयी त्या ५९ वर्षे वयाच्या होत्या. त्या पत्रकार दशरथ रणदिवे यांच्या चुलती होत्या.

त्यांच्या पार्थिवावर अंकोली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, सून, चार मुली, नातवंडे असा परिवार आहे.

सौ. विमल रणदिवे यांच्या दुःखद निधनाने रणदिवे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ईश्वर मृतात्म्यास शांती देवो व रणदिवे परिवाराला या दुकानातून सावरण्याचे बळ देवो, हीच बारामती झटका परिवाराकडून आदरांजली…

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button