वेळापूर विकास सोसायटीच्या सभासदांना ९ टक्के लाभांशाचे वाटप…

वेळापुर (बारामती झटका)
वेळापूर, ता. माळशिरस येथील वेळापूर विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या सभासदांना २०२५—२६ च्या आर्थिक वर्षाच्या नफा विभागणी वरून दीपावली सणा करिता ९ टक्के लाभांशाचे वाटप करण्यात आले.
सुरुवातीला सोसायटीचे ज्येष्ठ सभासद डॉक्टर रवींद्र देशपांडे व वेळापूर जिल्हा बँकेचे बँक इन्स्पेक्टर भोसले साहेब यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. लाभांश वाटपाची माहिती सचिव दीपक माळवदकर यांनी दिली.
यानंतर वेळापूर विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन अमरसिंह माने देशमुख यांनी संस्थेचा आढावा घेताना सांगितले की, संस्थेने सभासदांना दीपावली सणासाठी ७ लाख ८९ हजार ७०० रुपये लाभांश वाटप करण्यात आला असल्याचे सांगीतले.

यावेळी संस्थेचे चेअरमन अमरसिंह माने देशमुख, व्हाईस चेअरमन महादेवभाऊ ताटे, संचालक व ज्येष्ठ सभासद यांच्या हस्ते सभासदांना लाभांशाचे वाटप करण्यात आले.
यावेळी संचालक आनंदराव माने देशमुख, दत्तू माने, अर्जुन भाकरे, विश्वजीत माने देशमुख, हरीश मेटकरी, रावसाहेब माने देशमुख, हरिभाऊ माने देशमुख, हरिदास जाधव, दत्तात्रेय भानवसे, अशोक काशीद, रंगनाथ माने, जवळेकर काका, ज्ञानेश्वर सोनवणे, विनायक देशपांडे यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव दिपक माळवदकर, सहाय्यक शिवाजी आडत, संस्थेचे सर्व संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार महादेवभाऊ ताटे यांनी मानले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



