अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीवर पद्मजादेवी मोहिते पाटील यांची शासन नियुक्त संचालक पदी नियुक्ती करावी.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पद्मजादेवी मोहिते पाटील यांनी महायुतीचे प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे कौतुक करावे…..
अकलूज (बारामती झटका)
माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या सुनबाई व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या धर्मपत्नी अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर सिनेट सदस्या पद्मजादेवी मोहिते पाटील यांची अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीवर शासन नियुक्त संचालक पदी नियुक्ती करावी, अशी माळशिरस तालुक्यातील शेतकरी, व्यापारी व गाळेधारक यांच्यामधून मागणी होत आहे.
महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या सर्वेसर्वा व मार्गदर्शिका पद्मजादेवी मोहिते पाटील यांनी महायुतीचे लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केलेले आहे. त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करून शासन निमंत्रित संचालक पदावर काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी होत आहे.
महायुतीने महाराष्ट्राच्या राजकारणात सहकारामध्ये सहभाग व्हावा यासाठी बाजार समिती, साखर कारखाना, दूध संघ व अनेक संस्थांवर शासन निमंत्रित संचालक नेमलेले होते. दरम्यानच्या काळामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शासन निमंत्रित संचालक यांच्या नेमणुका रद्द केलेले होत्या. सध्या महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार स्थापन होऊन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विचाराचे सरकार स्थापन झालेले आहे. त्यामुळे महायुतीचे निमंत्रित संचालक विविध सहकारी संस्थांवर जातील. यामध्ये माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी, हमाल, व्यापारी, गाळेधारक यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याकरता पद्मजादेवी मोहिते पाटील यांची संचालक पदी नेमणूक होणे गरजेचे आहे. महायुतीच्या प्रतिकूल परिस्थितीत पद्मजादेवी मोहिती पाटील यांनी कोणत्याही अपेक्षेने काम केलेले नव्हते. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे कौतुक करून निमंत्रित संचालक पदावर नेमणूक करावी, अशी माळशिरस तालुक्यातील महायुतीच्या घटक पक्षातील नेते व कार्यकर्त्यांची सुद्धा मागणी आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.