ताज्या बातम्या

धक्कादायक प्रकार : माळशिरस पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यास जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकडून मारहाण

माळशिरस (बारामती झटका)

कामावरून काढून टाकल्याचा राग मनात धरून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी माळशिरस पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यास घरात घुसून काटीने मारहाण करून खिशातील 5000 रोकड जबरदस्तीने काढून घेऊन जिवे मारण्याची धमकी दिली.

ही घटना गुरुवार दि.१२/१२/२०२४ रोजी सायंकाळी ७ वा.१० मि. च्या सुमारास माळशिरस येथील पंचायत समिती वसाहतीत घडली आहे. डॉ. आबासाहेब हरी पवार असे मारहाण झालेल्या गट विकास अधिकारी यांचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अमोल दादासाहेब पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमोल बाबासाहेब पाटील हे जिल्हा परिषद मध्ये सेवेत असून ते नेमून दिलेली कामे व्यवस्थित करत नव्हते. या कारणामुळे जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कारवाई करून त्यांना नोकरीवरून कमी केले होते. याचा राग मनात धरून काल सायंकाळी त्यांनी गटविकास अधिकारी यांच्या घरात घुसून शिवीगाळ करत काठीने मारहाण करून जखमी केले. तसेच त्यांच्या खिशातील जबरदस्तीने 5000 रुपये रोकड रक्कम काढून घेतली. तुमच्यामुळे माझी नोकरी गेली जर, मला परत कामावर घेतले नाहीत तर तुम्हाला जिवंत ठेवणार नाही. तसेच येथे कसे नोकरी करतो तेच पाहतो असे धमकवल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button