औंध येथे श्री यमाई देवी यात्रा संपन्न होणार
श्री यमाई देवस्थान ट्रस्टच्या चीफ ट्रस्टी श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, राणीसाहेब यांच्या शुभहस्ते तर उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार…
औंध (बारामती झटका)
औंध ता. खटाव, येथे श्री यमाई देवी देवस्थान ट्रस्ट व औंध ग्रामस्थांच्या वतीने श्री यमाई देवी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेला सोमवार दि. १३/०१/२०२५ पासून प्रारंभ होत आहे. सदर यात्रेचे उद्घाटन श्री यमाई देवी देवस्थान ट्रस्टच्या चिफ ट्रस्टी श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी राणीसाहेब यांच्या शुभहस्ते तर उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. यावेळी ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री, ना. जयकुमार गोरे ग्रामविकास, पंचायत राजमंत्री, ना. मकरंद पाटील मदत व पुनर्वसन मंत्री, श्रीमंत छ. उदयनराजे भोसले खासदार सातारा जिल्हा, खा. सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, प. पू. सुंदरगिरी महाराज मठाधिपती पुसेगाव, फलटणचे आ. सचिन पाटील आदी मान्यवरांसहित सातारा जिल्ह्यातील खासदार, आमदार व सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित असणार आहेत.
सोमवार दि. १३/१२/२०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता दीपोत्सव व छबिना आणि मंगळवार दि. १४/१२/२०२५ रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे.
दि. १६/०१/२०२५ रोजी श्वान स्पर्धा, दि. १७/०१/२०२५ रोजी क्रिकेट स्पर्धा, दि. १८/०१/२०२५ रोजी शेतकरी संगीत खुर्ची, दि. १९/०१/२०२५ रोजी मॅरेथॉन स्पर्धा, दि. २०/०१/२०२५ रोजी स्लो सायकलिंग, दि. २१/०१/२०२५ रोजी शरीर सौष्ठव स्पर्धा, दि. २२/०१/२०२५ रोजी बैलगाडी शर्यत, दि. २४/०१/२०२५ रोजी कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त भाविकांनी या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.