चि. सौ. कां. काजल, इस्लामपूर व चि. विजय, कालटण आणि चि. सौ. कां. कोमल, इस्लामपूर व चि. प्रतीक, इस्लामपूर यांचा शाही शुभ विवाह सोहळा संपन्न होणार.

प्रेषक – श्री. नंदकुमार भानुदास काळे अतिरिक्त कार्यकारी अभियंता महावितरण सांगली, श्री. रामचंद्र श्रीरंग काळे
इस्लामपूर, ता. माळशिरस
इस्लामपूर (बारामती झटका)
श्री. गोरख विठ्ठल काळे यांची नात व श्री. अंकुश गोरख काळे रा. इस्लामपूर, ता. माळशिरस यांची जेष्ठ सुकन्या चि. सौ. कां. काजल काळे व स्वर्गीय भानुदास माधव सपकळ यांचे नातू व श्री. मधुकर भानुदास सपकळ, रा. कालटण नंबर 2, ता. इंदापूर यांचे ज्येष्ठ चिरंजीव विजय सपकळ आणि श्री. गोरख विठ्ठल काळे यांची नात व श्री. अंकुश गोरख काळे रा. इस्लामपूर, ता. माळशिरस, यांची कनिष्ठ सुकन्या चि. सौ. कां. कोमल व स्वर्गीय वेताळ नामदेव पवार यांचे नातू व श्री. नामदेव वेताळ पवार, रा. इस्लामपूर, ता. माळशिरस यांचे ज्येष्ठ चिरंजीव प्रतीक पवार यांचा शाही शुभविवाह सोहळा मंगळवार दि. 02/01/2024 रोजी दुपारी 12 वाजून 38 मिनिटे या शुभमुहूर्तावर सौभाग्य मंगल कार्यालय, माळीनगर, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित राहावे असे प्रेषक श्री. नंदकुमार भानुदास काळे अतिरिक्त कार्यकारी अभियंता महावितरण सांगली, श्री. रामचंद्र श्रीरंग काळे रा. इस्लामपूर यांच्यावतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.
नव्या जीवनाची नवी सुरुवात, नव्या नात्याच्या रेशीमगाठी, प्रेमाचा जिव्हाळा, आपुलकी सदा काठोकाठी, दोन घराण्यातील अनुबंध जुळतील शत जन्माचे ऋणानुबंध, साक्षी हळदी कुंकू सौभाग्याच्या लेण्याची, ओसांडून वाहे उत्साह, आनंदाची बरसत येईल अशा आगमनाने, तरी आपण या शुभमंगल प्रसंगी सहकुटुंब सहपरिवार अगत्य येण्याचे करावे व वधू-वरांना शुभाशीर्वाद द्यावेत यासाठी आपणास निमंत्रण दिलेले आहे.
लग्नाच्या घाईगडबडीत आमंत्रण अथवा निमंत्रण न मिळाल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे असे समस्त काळे परिवार, इस्लामपूर यांच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.