Uncategorized

बारामती झटका वृत्ताने विष प्राशन केलेल्या पीडित सासू सुनेच्या प्रकरणाला वाचा फुटली.

वेळापूर पोलीस स्टेशन येथे महिला व पुरुष अशा नऊ जणांवर श्रीमती सुप्रिया विजय बनकर यांची फिर्याद दाखल झाली.


वेळापूर ( बारामती झटका )

वेळापूर तालुका माळशिरस येथील प्रगतशील बागायतदार व उद्योजक स्वर्गीय संजय पांडुरंग बनकर यांच्या मातोश्री व भावजय यांनी नातेवाईक व इतर लोकांच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन केलेले होते. सदरच्या घटनेचे वृत्त बारामती झटका वेब पोर्टलवर प्रसिद्ध केलेले होते. सदरच्या वृत्तामध्ये सविस्तर वृत्तांकन केलेले असल्याने विष प्राशन केलेल्या पीडित सासू सुनेच्या प्रकरणाला वाचा फुटलेली आहे. वेळापूर पोलीस स्टेशन येथे श्रीमती सुप्रिया विजय बनकर यांच्या फिर्यादीवरून भारतीय दंड संहिता 1860 कलम 452, 323, 504, 506, 509,143 या कलमाने प्रकाश पांडुरंग राऊत माळशिरस, वंदना उर्फ सुनिता प्रकाश राऊत माळशिरस ,सचिन मारुती राऊत वेळापूर, मंदाकिनी सचिन राऊत वेळापूर, शंकर निवृत्ती शेंडे वरकुटे खुर्द इंदापूर, नंदिनी उर्फ मंदाकिनी शंकर शेंडे वरकुटे खुर्द इंदापूर ,सुरेश महादेव पिसे पिसेवाडी, महादेव ज्ञानेश्वर पिसे पिसेवाडी, नारायण व्यंकू शेंडगे पिसेवाडी, अशा नऊ महिला व पुरुष यांच्यावर वेळापूर पोलीस स्टेशन येथे श्रीमती सुप्रिया विजय बनकर यांनी फिर्याद दिलेली आहे. सदरची फिर्याद श्रीमती स्नेहा संजय बनकर यांनी टंकलेखन केलेले वाचून सहमती दिलेली आहे.

सदरच्या फिर्यादीमध्ये ननंद, नंदावे व अन्य व्यक्तींकडून कशाप्रकारे त्रास झालेला आहे, कशाप्रकारे धमकवत होते, हे नमूद केलेले आहे. अनेक दिवस प्रलंबित असणाऱ्या प्रकरणाला अखेर बारामती झटका वृत्तामुळे वाचा फुटलेली आहे. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सई भोर पाटील यांचे मार्गदर्शन घेऊन वेळापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव सदरच्या प्रकरणाचा योग्य तपास करीत आहेत. पीडित सासू सुनांना सदरच्या प्रकरणात न्याय मिळेल असे स्वर्गीय संजय बनकर व विजय बनकर यांचे नातेवाईक व मित्रपरिवार यांच्यामधून बोलले जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button