बार्डी येथे विकासप्रिय आमदार बबनराव (दादा) शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आट्या पट्या स्पर्धेचे आयोजन

स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजीतभैया शिंदे यांच्या वतीने ५५,५५५ रु.
बार्डी (बारामती झटका)
विकासप्रिय आमदार बबनराव (दादा) शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आट्या पट्या स्पर्धेचे आयोजन अभिजीत भैय्या मित्र मंडळ बार्डी व समस्त ग्रामस्थ बार्डी यांच्यावतीने मंगळवार दि. २४ सप्टेंबर २०२४ रोजी बार्डी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजीतभैया शिंदे यांच्या वतीने ५५,५५५ रु., द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व बार्डी ग्रामपंचायतीचे उपसरपंच अभिजीत (भैया) कवडे यांच्यावतीने ४१,५५५ रु., तृतीय बक्षीस कै. मोहन (आप्पा) कवडे यांच्या स्मरणार्थ २५,५५५ रु., चतुर्थ बक्षीस मुख्याध्यापक कालिदास गणपत कवडे (सर) व संतोष आबा कवडे यांच्या वतीने ११,५५५ रू., पाचवे बक्षीस चेअरमन समाधान (आण्णा) लाटे आणि बिभीषण लाटे यांच्या वतीने ५,५५५ रु. देण्यात येणार आहे.

तसेच या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट सूरकरी यांच्यासाठी बार्डी ग्रामपंचायत सदस्य शंकर चव्हाण यांच्या वतीने १,१५५ रु., उत्कृष्ट खेळाडूसाठी बार्डी ग्रामपंचायत सदस्य अरुण माळी यांच्या वतीने १,१५५ रु. आणि उत्कृष्ट फटक्यासाठी बार्डी ग्रामपंचायत सदस्य सटवाजी देवकुळे यांच्या वतीने १,१५५ देण्यात येणार आहे. तसेच या स्पर्धेसाठी ट्रॉफीचे सहकार्य बार्डी ग्रामपंचायतचे सरपंच उमेश खंदारे, बार्डी ग्रामपंचायत सदस्य कल्याणराव कवडे आणि मार्डी ग्रामपंचायत सदस्य ऐनुद्दीन मुलाणी यांच्या वतीने असणार आहे. त्याचबरोबर तालुका शो मॅच ५,५५५ बार्डी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वसेकर आणि बार्डी ग्रामपंचायतचे सदस्य रावसाहेब कवडे (सर) यांच्या वतीने असणार आहे.
तसेच या स्पर्धेच्या दरम्यान पार्टी ग्रामपंचायत सदस्य बबलुभाई सय्यद व दादाराव भोसले आणि व्हा. चेअरमन कैलास शिंदे यांच्या वतीने भोजनव्यवस्था व सहकार्य असणार आहे. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी दीपक लाटे ९३७०७१६३३३, बालाजी बागल ८२०८०२३७११, बिभिषण नाईकनवरे (सर) ९५५२९७४०१२ आणि सचिन कदम ७७०९४२७४४२ यांच्याशी संपर्क साधावा. सदर स्पर्धेसाठी जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.