ताज्या बातम्या
बार्शी येथील श्रीम. कमल घोडके यांचे वृद्धापकाळाने निधन
बार्शी (बारामती झटका)
बार्शी येथील श्रीम. कमल रामचंद्र घोडके (वय ७८) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर बार्शी येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्या बार्शी येथील ॲड. सौ. संगिता देशपांडे यांच्या मातोश्री व विश्लेषक श्री. अनिल देशपांडे यांच्या सासू होत.
स्व. श्रीम. कमल रामचंद्र घोडके यांच्या आत्म्यास शांती लाभो व घोडके परिवारास या दु:खातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो, हीच बारामती झटका परिवाराकडून भावपूर्ण आदरांजली…
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.