भगवानराव रामचंद्र गोरे (दादा) यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने दुःखद निधन

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना पितृषोक…
बिदाल (बारामती झटका)
बोराटवाडी, ता. माण येथील भगवानराव रामचंद्र गोरे उर्फ दादा यांचे दीर्घ आजाराने पहाटे वयाच्या 75 व्या वर्षी दुःखद निधन झालेले आहे. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांचे वडील होते.
भगवानराव गोरे उर्फ दादा यांच्यावर मागील काही दिवसांपासून पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र अंकुश, जयकुमार, शेखर, कन्या सौ. सुरेखा, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.

दादांचा सुसंस्कृत व सोज्वळ स्वभाव होता. प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मुलांना संस्कार देऊन त्यांनी घडविलेले होते. गेल्या १३ वर्षांपूर्वी पत्नीचे निधन झालेले होते. दादांनी मातृत्व आणि पितृत्वाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळलेली होती. आज गोरे बंधू यांचे पितृत्व हरपले आहे.
कै. भगवानराव गोरे (दादा) यांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो व गोरे परिवार यांना दुःखातून सावरण्याचे परमेश्वर बळ देवो, हीच बारामती झटका परिवार यांचेकडून ईश्वर चरणी प्रार्थना. दादांना भावपूर्ण श्रद्धांजली आहे.
स्वर्गीय दादांचे अंतिम दर्शन आज मंगळवार दि. २५ फेब्रुवारी सकाळी ११.०० ते ४.०० वाजेपर्यंत त्यांच्या बोराटवाडी येथील निवासस्थानी होणार आहे.
अंत्यविधी बोराटवाडी ता. माण, जि. सातारा येथे दुपारी ४ वाजता होणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.