२०३६ मध्ये होणाऱ्या ऑलंपिक स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामिगिरी करुन भारत देशास सुवर्णपदक पटकवावे – क्रीडामंत्री ना. दत्तात्रय भरणे

आंध्रप्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेसाठी विजयकृष्ण स्वाती नवनाथ थोरात याची वैयक्तिक प्रकार आणि महाराष्ट्र राज्याकडून सांघिक प्रकारासाठी निवड
(बारामती झटका)
दि. २३ मार्च रोजी आंध्रप्रदेश (गुंटूर) येथे होणाऱ्या दहा वर्षाखालील राष्ट्रीय तिरंदाजी (आर्चरी) स्पर्धेसाठी चि. विजयकृष्ण स्वाती नवनाथ थोरात याची वैयक्तिक प्रकार आणि महाराष्ट्र राज्याकडून सांघिक प्रकारासाठी निवड झाल्याबद्दल राज्याचे विद्यमान क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री मा. दत्तात्रय भरणे (मामा) यांच्या हस्ते सत्कार करून पुढील राष्ट्रीय सामन्यांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
दहा वर्षाखालील गटात तिरंदाजी प्रकारात इतकी छान प्रगती पाहता, त्याने सन २०३६ मध्ये होणाऱ्या ऑलंपिक स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामिगिरी करुन भारत देशास सुवर्णपदक पटकवावे, अशी इच्छा व्यक्त केली.
सर्वसामान्य कुटूंबातून व ग्रामिण भागातून चि. विजयकृष्णच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. सत्काराप्रसंगी त्याचे प्रशिक्षक सुरज ढेंबरे, शेखर देवकर, निखिल गुरव, वडील नवनाथ थोरात, आई स्वाती थोरात, आजोबा डॉ. गजानन टिंगरे आदी उपस्थित होते. सदरच्या यशात चि. विजयकृष्णच्या प्रशिक्षकांचा मोलाचा वाटा आहे, असे मनोगत पालकांनी व्यक्त केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.