भाजप प्रदेश उपाध्यक्ष पदावर सुशांत बापूसाहेब निंबाळकर

सातारा (बारामती झटका)
भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश किसान मोर्चा उपाध्यक्षपदी फलटण तालुक्यातील आदर्श गाव विंचुर्णीचे सुपुत्र सुशांत बापूसाहेब निंबाळकर यांची प्रदेश उपाध्यक्ष तथा भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी निवड करण्यात आली. खा. श्री. छत्रपती उदयनराजे भोसले यांचे व माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे कट्टर समर्थक फलटण बाजार समितीचे माजी संचालक विंचुर्णी गावचे आदर्श सरपंच व 2014 ते 2019 फलटण तालुकाध्यक्ष पदावर कार्यरत तसेच युवा जिल्हाध्यक्ष व प्रदेश युवा मोर्चा पश्चीम महाराष्ट्र संपर्क प्रमुख या पदावर नाविन्यपूर्ण कार्यरत असलेले सुशांत बापूसाहेब निंबाळकर यांची नियुक्ती केल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. तसेच भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष गणेश तात्या भेगडे यांनी केली.
गेली अनेक वर्षे सुशांत निंबाळकर हे खासदार श्री. छत्रपती उदयनराजे भोसले यांचे व खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे विश्वासू समर्थक व बंधु म्हणून कार्यरत आहेत. तसेच फलटणचे जेष्ठ व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती स्व. बि. के. भाऊ निंबाळकर याचे सुशांत सुपुत्र आहेत. ग्रामविकास, सहकार, कृषी याचा गाढा अभ्यास असलेल्या सुशांत निंबाळकर यांचे युवा संघटन कौशल्यही उत्कृष्ट आहे. उदयनराजेंची सावली म्हणून महाराष्ट्रभर त्यांची ओळख आहे. सुशांत निंबाळकर यांनी यापूर्वी सातारा जिल्हाध्यक्ष कारकिर्दीत सातारा जिल्ह्यात उदयनराजेंच्या व खासदार रणजीतसिंहदादांच्या माध्यमातून विकासाचा झंजावात निर्माण करण्यात सुशांत निंबाळकर यांना यश आले होते. पश्चिम महाराष्ट्र युवा संघटन कौशल्याची जबाबदारी निंबाळकर यांच्याकडेच असते. निंबाळकर यांचे संघटन कौशल्य, बेरजेचे राजकारण व काॅलेज जीवनापासून काॅलेज निवडणुकीत सहभाग व अखंड स्वराज्य गृप महाराष्ट्र याच्या माध्यमातून कार्य करण्याची हातोटी व प्रभावी जनसंपर्क यामुळे भाजपने त्यांच्यावर प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे.


याशिवाय भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणूनही त्यांची नियुक्ती केली असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी मुंबईत केली. बावनकुळे यांच्या हस्ते निंबाळकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. प्रदेश कार्यकारिणी व भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष किसान मोर्चा नियुक्ती होताच राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी निंबाळकर यांचे अभिनंदन केले. यावेळी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर. खा धंनजय महाडिक, आ. छत्रपती शिवेंद्रराजे भोसले. आ. जयकुमार गोरे, आ. श्रीकांतजी भारतीय, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, संग्राम बर्गे, काका धुमाळ, पंकज चव्हाण, बाळासाहेब खरात, शैलेश संकपाळ, अमोल सणस, विनीत पाटील आदी उपस्थित होते.
निंबाळकर यांच्या नियुक्तीबद्दल राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले, खा. उदयनराजे भोसले, खा. रणजितसिंह ना. निंबाळकर, आ. जयकुमार गोरे, आ. शिवेंद्रराजे भोसले, सातारा लोकसभा सुनिल तात्या काटकर, मा. प्रवीणनाना काळभोर उपाध्यक्ष पुणे जिल्हा, नरेंद्रजी पाटील, धैर्यशील कदम, संघटनमंत्री मकरंद देशपांडे, फलटण नगरपरिषद विरोध पक्ष नेते समशेरदादा नाईक निंबाळकर, लोकसभा प्रभारी अतुलबाबा भोसले, प्रदेश सचिव भरतनाना पाटील, महिला प्रदेश उपाध्यक्षा सौ. चिञलेखाताई माने कदम, जिल्हा परिषद सदस्या सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, माजी आमदार दिलीप येळगावकर, मा. अविनाश फरांदे, माजी आमदार मदनदादा भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, मनोजदादा घोरपडे, रामकृष्ण वेताळ, अभिजीतभैया नाईक निंबाळकर, प्रल्हादराव साळुंखे पाटील, विश्वासराव भोसले, हनमंतराव मोहीते, सचीन कांबळे पाटील, डॉ. प्रियाताई शिंदे, विक्रीबाबा पाटणकर, विठ्ठल बलशेटवार, महिला आघाडी अध्यक्ष सुरभीताई भोसले, युवक अध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, महेश गाडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, जिल्हाध्यक्ष धनंजय पवार, सागर शिवदास, अशोकराव जाधव, जयकुमार शिंदे, पाटणकर, लोहोटी, विशाल माने, अमोल बोडके, सोरभ जाधव, राहुल पिसाळ यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.