भाजपचे महादेव कावळे यांच्या संकल्पनेतून महिलांना विमानातून तिरुपती बालाजी दर्शनाचा योग…..
अकलूज नगरपरिषद हद्दीतील हजार महिलांना विमानाने बालाजी दर्शन घडविण्याचा महादेव कावळे व डॉ. निलेश ननवरे यांचा नवीन वर्षात संकल्प…
अकलूज (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते, भाजपचे विशेष निमंत्रित प्रांतिक सदस्य व माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे अकलूज शहर अध्यक्ष महादेव कावळे व भाजपचे तालुका प्रभारी डॉक्टर निलेश ननवरे यांनी नवीन वर्षात अकलूज नगर परिषद हद्दीतील सर्वसामान्य व गोरगरीब महिलांसाठी संकल्प केलेला आहे. महिलांना विमानातून तिरुपती बालाजी दर्शनाचा योग राम-लक्ष्मणासारख्या सामाजिक कार्य करणाऱ्या जोड गोळीने हजारो महिलांना विमानाने बालाजी दर्शन घडविण्याचा संकल्प केलेला आहे.
सर्वसामान्य व गोरगरीब कुटुंबांमधील महादेव व डॉक्टर निलेश यांचा जन्म झालेला आहे. समाजाची व जनतेची सेवा करण्याकरता घरची परिस्थिती कशीही असो मात्र, मनाची श्रीमंती लागते याचाच प्रत्यय सामाजिक कार्यकर्ते महादेवराव कावळे व डॉक्टर निलेश ननवरे यांच्या सामाजिक कार्यातून पहावयास मिळत आहे. कोरोना महामारीच्या काळामध्ये 300 महिलांना रोज सकाळ-संध्याकाळ जेवणाचे डबे घरपोच केले जात होते. खऱ्या अर्थानं माणुसकीचे दर्शन कोरोनाच्या कालावधीत पाहावयास मिळत होते. अशा कठीण परिस्थितीत गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला आधार देण्याचे काम केलेले आहे. गोरगरीब व सर्वसामान्य महिलांना स्वतःचा व्यवसाय करता यावा यासाठी आजपर्यंत 200 शिलाई मशीनचे वाटप केलेले आहे. गरीब परिस्थितीमुळे शाळेमध्ये जाण्याकरता 200 सायकलचे वाटप करण्यात आलेले होते. कुडाच्या काडाच्या घरामध्ये लोकांची अडचण होती, यासाठी 125 कुटुंबांना पत्र्याचे वाटप करून त्यांच्या आनंदामध्ये सहभागी झालेले आहेत.
माळशिरस नगरपंचायत हद्दीमधील 375 महिलांना ट्रेन ने बालाजी दर्शन घडवलेले आहे. 125 महिलांना विमानाने बालाजी दर्शन घडविलेले आहे. उर्वरित महिलांना तिरुपती बालाजीचे दर्शन विमानाने घडविण्याचा संकल्प केलेला आहे. दरवर्षी 200 महिला तिरुपती बालाजी दर्शनासाठी घेऊन जाणार आहेत. सदरच्या महिलांचे विमानसेवेचे तिकीट काढण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे. तिरुपती बालाजी दर्शन जाण्यासाठी अनेक महिला इच्छुक आहेत, त्या इच्छुक महिलांना विनंती आहे. महादेव कावळे 9922834232 व डॉक्टर निलेश ननवरे 9766499100 या नंबर वर संपर्क साधावा. श्रावण महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तिरुपती बालाजी दर्शनाची मोहीम विमानाने जाणार आहे. तरी इच्छुक महिलांनी या नंबरवर संपर्क साधावा, असे महादेव कावळे व डॉक्टर निलेश ननवरे यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.