ताज्या बातम्याराजकारण

भाजपच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी चेतनसिंह केदार सावंत यांची फेरनिवड

सांगोला (बारामती झटका)

जिल्हाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात भारतीय जनता पार्टी संघटन पर्व अभियानांतर्गत भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणीत राज्यात प्रथम क्रमांकाची नोंदणी करून उल्लेखनीय कामगिरी केल्याची दखल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली आहे. भाजपच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी चेतनसिंह केदार सावंत यांची फेरनिवड झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला.

जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची पकड अधिक घट्ट करण्यासाठी भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या आदेशान्वये  सदस्य नोंदणीची जोरदार मोहीम हाती घेतली होती. या अभियानात भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा भाजप सदस्य नोंदणीत महाराष्ट्रात अव्वल ठरला आहे. त्याची पोचपावती म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकारिणीच्या साक्षीने भाजपचे सोलापूर ग्रामीण पश्चिमचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांचा सन्मान करून शाबासकी दिली.

आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सदस्य नोंदणीचे उदिष्ट दिले होते. जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दिवस-रात्र मेहनत करून सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यातील तालुकाप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते, शक्ती केंद्रप्रमुख व बूथ प्रमुख यांनी भाजप सदस्य मोहिमेत राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष तथा संघटन पर्व प्रभारी रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर, आमदार चित्राताई वाघ, प्रदेश महामंत्री राजेश पांडे, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार राजाभाऊ राऊत, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात भाजपचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नूतन जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button