महाळुंगचे ग्रामदैवत श्री यमाई देवीचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी मनोभावे घेतले दर्शन

महाळुंग (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील श्रीक्षेत्र महाळुंग गावचे जागृत देवस्थान ग्रामदैवत श्री यमाई देवीचे आषाढ महिन्यातील शुक्रवारी बारामती झटका चे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी मनोभावे दर्शन घेतले.



नवसाला पावणाऱ्या श्री यमाई देवीच्या प्रांगणामध्ये माकड या वन्य प्राण्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. या माकडांचे माकडचाळे महाळूंग येथे पहावयास मिळत आहेत. भाविकांच्या हातातील नैवेद्य पळवणे, पिशवी ओढणे, चप्पल ठेवलेले अस्ताव्यस्त करणे असे अनेक माकडचाळे सुरू असतात.
बारा महिने भाविक मनोभावे व भक्ती भावाने ग्रामदैवत यमाई देवीच्या दर्शनासाठी आवर्जून येत असतात. संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणाने फुलून गेलेला आहे.



नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



