ताज्या बातम्याराजकारण

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आ. राम सातपुते यांच्याकडे अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश प्रभारी पदाची जबाबदारी…

मुंबई (बारामती झटका)

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्याकडे अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश प्रभारी पदाची जबाबदारी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियुक्तीपत्र देऊन दिलेली आहे.

आमदार राम सातपुते यांनी शाखेपासून ते युवा मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदापर्यंत काम केलेले आहे. वक्तृत्व आणि संघटन कौशल्य यामधून आमदार राम सातपुते यांनी भारतीय जनता पक्षाचे काम निष्ठेने व प्रामाणिकपणे केलेले आहे. त्यांना महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश प्रभारी पदाची जबाबदारी देऊन कार्यविस्तार यशस्वीपणे करणार असल्याची खात्री असल्याने आमदार राम सातपुते यांच्याकडे विशेष जबाबदारी देण्यात आलेली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button