झी टॉकीज फेम ह. भ. प. आशिषजी काटे महाराज, भालवडी, सातारा यांचे सुश्राव्य कीर्तन होणार..

हनुमाननगर, कचरेवाडी येथील स्वर्गीय महादेव सिदू तरडे उर्फ दादा यांच्या द्वितीय पुण्यस्मरण निमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन…
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस पंचक्रोशीतील सुसंस्कृत व सोज्वळ व्यक्तिमत्व प्रगतशील बागायतदार स्वर्गीय महादेव सिदु तरडे उर्फ दादा यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त झी टॉकीज फेम ह. भ. प. आशिषजी काटे महाराज भालवडी, सातारा यांचे रविवार दि. ०१/०९/२०२४ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेमध्ये हनुमाननगर, कचरेवाडी, ता. माळशिरस येथे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित रहावे असे तरडे परिवार यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.

मनासारखा राजा | राजासारखे मन || कधी न दाखविले मोठेपण | आठवण येता तुमची || कंठ दाटून येतो | प्रेम देऊनी सर्वांना || तुम्ही माणसे जोडली | कुठून आणावी अशी दिव्यमूर्ती || घ्यावा पुनर्जन्म दादा | तुम्ही आमच्यासाठी ||
असा कृतज्ञ भाव व्यक्त करीत द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी, आरती व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. तरी मित्रपरिवार, नातेवाईक व ग्रामस्थ यांनी उपस्थित राहावे, असे तरडे परिवार यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.