“भरवशाच्या म्हशीला टोणगा होणार”, अशी माढा लोकसभा मतदार संघात शरदचंद्र पवार यांची राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे.
माजी आमदार स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख त्यांच्या अपक्ष उमेदवारीने “महाविकास आघाडीत बिघाडी” झाली….
माळशिरस (बारामती झटका)
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते माजी कृषी मंत्री स्वर्गीय गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब यांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी माढा लोकसभा मतदार संघात अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, शेतकरी कामगार पक्ष असे अनेक पक्ष मिळून महाविकास आघाडी निर्माण झालेली आहे. शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या अपक्ष उमेदवारीने महाविकास आघाडीत बिघाडी झालेली आहे. त्यामुळे “भरवशाच्या म्हशीला टोणगा होणार”, अशी माढा लोकसभा मतदार संघात शरदचंद्र पवार यांची राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे.
महायुतीने पुनश्च माढा लोकसभेची उमेदवारी कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर भारतीय जनता पक्षातून बंड करून धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करून महाविकास आघाडीकडून माढा लोकसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील राजकीय बेरजेमध्ये सांगोला विधानसभा मतदार संघात स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांच्या शेतकरी कामगार पक्षाचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळेल अशी अपेक्षा होती. कारण महाविकास आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्ष आहे परंतु, युवानेते डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी बंडाची भूमिका घेत अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतलेला आहे. महाविकास आघाडीत बिघाडी झालेली आहे. ग्रामीण भागात म्हण प्रचलित आहे, भरवशाच्या म्हशीला टोणगा होणार, अशी माढा लोकसभा मतदारसंघात शरदचंद्र पवार यांची राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे.
सांगोला विधानसभा मतदार संघात दोन राजकीय गट असणारे आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील महायुती सोबत आहेत. महाविकास आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्ष सहभागी आहे. डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी बंडाचा झेंडा हाती घेतलेला असल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील सांगोला विधानसभा मतदारसंघात डोकेदुखी ठरणार आहे. कारण, शेतकरी कामगार पक्षाचे मतदारसंघ तर सांगोला विधानसभा मतदारसंघात मोहिते पाटील यांना हक्काचा मतदार नाही. माढा लोकसभा मतदारसंघात माळशिरस वगळता कोणत्याच मतदारसंघात मोहिते पाटील आघाडीवर राहतील, अशी राजकीय परिस्थिती नाही. माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातील पाण्याचे प्रश्न सोडविलेले असल्याने मतदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी ठाम आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांना शेतकरी कामगार पक्षाच्या मतदारावर अवलंबून राहावे लागत होते मात्र, डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या भूमिकेमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी झालेली आहे. त्यामुळे भरवशाच्या म्हशीला टोणगा होणार, अशी माढा लोकसभा मतदारसंघात शरदचंद्र पवार यांची राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
I thoroughly enjoyed this piece. It was both informative and engaging, providing a lot of valuable information. Let’s discuss further. Check out my profile for more interesting content.
Awesome page with genuinely good material for readers wanting to gain some useful insights on that topic! But if you want to learn more, check out YQ9 about Thai-Massage. Keep up the great work!