मळोली येथील श्रीमती देवई गणपत कदम यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.
सातारा जिल्हा बीज प्राधिकरण अधिकारी श्री. बाळकृष्ण कदम यांना मातृषोक..
मळोली (बारामती झटका )
मळोली ता. माळशिरस, येथील श्रीमती देवई गणपत कदम यांचे वयाच्या 92 व्या वर्षी बुधवार दि. 20/12/2023 रोजी रात्री 09 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात रामचंद्र, बाळकृष्ण, बाबुराव तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सातारा जिल्हा बीज प्राधिकरण अधिकारी श्री. बाळकृष्ण गणपत कदम यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्यावर मळोली-तांदुळवाडी रोडवर राहत्या निवासस्थानाशेजारील शेतामध्ये अंत्यसंस्कार रात्री 02 वाजता करण्यात आलेले आहेत.
श्रीमती देवईबाई कदम यांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असल्यामुळे त्यांची हरिनामाच्या गजरामध्ये देहू संस्थांचे माजी अध्यक्ष जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे वंशज गुरुवर्य ह.भ.प. बापूसाहेब देहूकर महाराज यांच्या नियोजनात अंत्ययात्रा काढलेली होती. यावेळी परिसरातील नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांचा रक्षा विसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम शुक्रवार दि. 22/12/2023 रोजी सकाळी 7.30 वाजता होणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.